अनेकदा बाहेरच्या राज्यात स्वस्तात मिळणाऱ्या गोष्टी आपल्याकडे खूपच महाग मिळतात. याबाबत अनेकांना माहिती देखील नसते. आता असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. तेलंगणा राज्यातील कागजनगर व माकोडी येथील शेतकरी आपला तांदूळ रेल्वेने आणून विरुर येथील बाजारात विकत आहे. हे शेतकरी आपल्या नातेवाईकांना देत असल्याची माहिती समोर येत होती. असे असताना हा प्रकार रोजच असल्याने याबाबत संशय वाढत गेला, दररोज विरुर रेल्वे स्टेशनवर उतरणारा तांदूळ कोणत्या नातेवाईकांकडे जातो. विरुर ही बाजारपेठ एवढी मोठी आहे की, या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात तांदूळ उतरवून विकला जात आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.
असे असताना तेलंगणामधील एक रुपया किलोचा तांदूळ महाराष्ट्रात तब्बल चाळीस रुपये किलोने विक्री होत असल्याची धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामुळे याबाबत चौकशी सुरु आहे. हा तांदूळ ब्रह्मपुरी, गोंदियाला पाठवून त्याठिकाणी मिलमध्ये पिसाई केली जाते. नंतर लेबल बदलवून खुल्या बाजारात जादा दराने विक्रीला आणला जात आहे. यात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. यामध्ये फारच कमी किमतीचा तांदूळ जास्त किमतीत विकला जात असल्याचे समोर येत आहे.
याबाबत अन्न पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनाने लक्ष घालून कारवाई गरजेची आहे. यामुळे आता चौकशी सुरु आहे. तांदूळ तस्करीसंबंधी संबंधित पोलीस व अन्न प्रशासन विभागाने याकडे लक्ष टाकून योग्य ती कार्यवाही करावी. करावी अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार केल्या जातील, असेही नागरिकांनी म्हटले आहे. यामुळे आता कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन वर्षांपूर्वी येथील तांदूळ साठवून ठेवणाऱ्या दोन ते तीन गोदामावर कारवाई झालेली आहे. हे सर्वश्रुत असून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत तांदळाची तस्करी करीत आहे.
असे असताना पोलीस प्रशासन शेतकऱ्याचा तांदूळ म्हणत मौन धारण करत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. यापूर्वीही या ठिकाणी होणाऱ्या तांदूळ तस्करीच्या तक्रारी झाल्या आहे. मात्र पुढे त्याचे काहीच झाले नाही. यामुळे सध्या महाराष्ट्रात तांदूळ चढ्या भावाने विकला जात आहे. याची झळ सर्वसामान्य लोकांना थेटपणे बसत आहे. यामुळे आता तरी कारवाई होणार का असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.
Published on: 30 January 2022, 04:02 IST