News

आपण दररोज अशा काही घटना ऐकत असतो किंवा वाचत असतोकीत्याकधीकधी अविश्वसनीय वाटतात किंवा आपल्याला त्यांचे एकदम कौतुक वाटते. दररोज अशा घटना विविध क्षेत्रांमध्ये घडत असतात.

Updated on 21 September, 2021 10:54 AM IST

 आपण दररोज अशा काही घटना ऐकत असतो किंवा वाचत असतोकीत्याकधीकधी अविश्वसनीय वाटतात किंवा आपल्याला त्यांचे एकदमकौतुक वाटते. दररोज अशा घटना विविध क्षेत्रांमध्ये घडत असतात.

 परंतु अशा अविश्वसनीय घटना  आता शेती क्षेत्रामध्ये सुद्धा घडत आहेत. शेती क्षेत्रामध्ये अशा अविश्वसनीय घटनांमागे तंत्रज्ञानाचा मोठा हात आहे.कष्ट आणि योग्य प्रकारचे व्यवस्थापन या द्वारेहे घडू शकते. असंच एक अविश्वसनीय काम ब्रिटिश नागरिकाने करून दाखवले आहे.  ज्यांचे नाव आहे डग्लस स्मितया लेखामध्ये आपण त्यांनी केलेल्या अशाच एका अविश्वसनीय कामाबद्दल माहिती घेऊ.

 43 वर्षाचे डग्लस स्मित हे ब्रिटिश नागरिक असून त्यांनी टोमॅटोच्या एका फांदीला एक नाही दोन नाही तर तब्बल 839 टोमॅटोचे उत्पन्न घेतले आहे. ते एक आयटी मॅनेजर असून त्यांनी आपल्या आवडी निवडजपत एकाच फांदीवर अधिक उत्पन्न मिळवले आहे व अधिक उत्पन्नाचा रेकॉर्ड ब्रेक केलाआहे.

त्यांनी मार्च महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड केली होती आणि प्रत्येक रोपाला ते त्यांच्या दैनंदिन कामाच्या व्यापातून आठवड्यातून तीन ते चार तास एवढा वेळदेतात.

 या टोमॅटोच्या रोपांची लागवड त्यांनी ग्रीन हाउस मध्ये केली आहे. मागच्या वर्षी ब्रिटनमध्ये सर्वात अधिक मोठे टोमॅटोचे रुपये उगवण्याचा रेकॉर्ड मोडला गेला होता. याच प्रयत्नांचा भाग म्हणून टोमॅटोचे एका फांदीपासून एवढे भरघोस उत्पादन काढले गेले असल्याचे दिसत आहे.डगलस यांनी सर्वात जास्त उत्पन्न काढण्याचे आव्हान स्वीकारून त्यांनी टोमॅटो पिकाचे संपूर्ण काळजी घेतली तसेचटोमॅटो तोडताना देखील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले. अगोदर माती परीक्षण करून मातीच्या सॅम्पल वर काम केले व नंतर बिया पेरून टॉमेटोचे रोप तयार केले. यासाठी त्यांनी भरपूर मेहनत केली व याचे अधिक फळ मिळवले.

 

यादी टोमॅटोचा एकाच फांदीवर 448 टोमॅटोचे उत्पन्न घेण्याचा रेकॉर्ड हा 2010 मध्ये ग्राहमटँटरयांच्या नावावर होता.आता डग्लस स्मित यांनी हा रेकॉर्ड मोडत त्यांच्या पेक्षा दुप्पट टोमॅटोचे उत्पन्न घेतले आहे.डग्लस  त्यांनी गिनेस वर्ल्ड रेकॉर्डसाठी व्हेरिफायकरण्यासाठी फळे तोडताना पोलिसांना देखील बोलावले होते कारण त्यांनी त्यांच्या फार्ममध्ये लावलेल्या टोमॅटोच्या एका फांदीवरून तब्बल 839 फळे तोडली.यादरम्यान तिथे उपस्थित असलेलेलोकही चकित झाले.

English Summary: one branch of tomato plant take 839 tommato production
Published on: 21 September 2021, 10:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)