शेती हेच शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन आहे. मात्र शेती व्यवसाय करताना शेतकरी बंधूना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. शेतात काम करत असताना शेतकरी बंधूनी खबरदारी घेणं महत्वाचं आहे. घाई गडबडीत किंवा लक्षपूर्वक काम न केल्यास शेतकऱ्यांच्या अंगलट येत आहे. नुकतेच,केवळ बीड जिल्ह्यातून एकाच दिवशी तीन शेतकरी बंधूंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. केज, गेवराई तसेच आष्टी तालुक्यात ही दुर्घटना घडली आहे.
एकाच दिवशी या घटना घडल्याने बीड जिल्ह्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सध्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंची शेतीकामाची लगबग सुरु झाली आहे. सध्या खरीपाच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत करणे सुरु झाले आहे. शेतात काम करताना दुर्दैवाने तीन शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.
पहिली घटना घडली आहे, केज तालुक्यातील हनुमंत पिंप्री येथे. विजेचा धक्का लागल्याने बाबूराव गणपतराव चंदनशिवे (वय,55) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सायंकाळच्या सुमारास बाबूराव चंदनशिवे हे विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले असता लोखंडी विद्युत पोलला स्पर्श झाल्याने शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंददेखील करण्यात आली आहे. तर दुसरी दुःखद घटना घडली आहे गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे.
विजेचा धक्का लागून एका शेतकरी बंधूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतकरी संजय बर्गे हे आपल्या शेतात नांगरणी करत होते मात्र खाली लोंबकळलेली विद्युत तार त्यांच्या निदर्शनास न आल्याने स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. व्यावसायिक आणि प्रगतशील शेतकरी म्हणून गेवराई शहरात शहरात त्यांची ओळख होती. तर अजून एक दुर्घटना घडली आहे, आष्टी तालुक्यात.
शेणामुळे झाला जबरदस्त फायदा; 'या' देशाकडून भारताला आली सर्वात मोठी मागणी
आष्टी तालुक्यातील शिरपूर येथे विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. शेतकरी श्रीकृष्ण जगताप हे आपल्या शेतात विदूत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मात्र काही तांत्रिक बिघाडीमुळे ते शेततळ्यात उतरले. शेततळ्याच्या वर येताना ते एका दोरखंडाची सहाय्यता घेत वर येत होते मात्र अचानक दोरखंड तुटला आणि ते पाण्यात पडले. त्यांना पाण्यात पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. सध्या बीड परिसरात शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दुप्पट उत्पन्न देणाऱ्या ऊसाच्या जातीला लवकरच मिळणार मान्यता
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर! मविआ करणार लवकरच एक लाख पदांची मोठी भरती
Published on: 16 June 2022, 12:14 IST