News

शेती व्यवसायात रूढी परंपरा ही ठरलेली असते. मग शेतात पेरणी करो कोंब काढणी शेतकरी मुहूर्त हे काढतात. याचप्रमाणे एक परंपरा आहे ती म्हणजे सालगड्याची. गुढीपाडवा पासूनच शेतकऱ्यांचे शेतीव्यवसायचे नववर्ष चालू होते. रब्बी हंगाम अंतिम टप्यात असताना नववर्ष चालू होते. ग्रामीण भागात नववर्षाच्या सुरुवातीस सालगडी ठेवण्याची परंपरा असते. शेतातील कामे तसेच जनावरांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी शेतमालक सालगड्याची नेमणूक करतो. वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजून ही प्रथा चालू आहे. पूर्वी सालगड्याचे वार्षिक वेतन ५० हजार रुपये होते तर आता बदलत्या काळानुसार लाखो रुपये वेतन झाले आहे.

Updated on 03 April, 2022 6:57 PM IST

अशाप्रकारे ठरविला जातो सालगडी :-

वर्षभर मजुराने शेतकऱ्याच्या रानात राबने म्हणजे सालगडी. याआधी सालगड्याला काही धान्य आणि रक्कम दिली जायची मात्र आता बदलत्या काळानुसार त्याच्या धान्यात आणि पैशात सुद्धा वाढ झालेली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला जो मजूर ज्या शेतकऱ्याच्या रानात काम करणार आहे तो मजूर आणि शेतकरी व गावातील प्रतिष्ठित मंडळी एकत्र येते आणि सालगड्याची मजुरी ठरवून देते. तिथे जे सर्व काही घडेल त्यानुसार शेतकरी त्या मजुरास पैसे देण्याचे काम करतो. अशा प्रकारे शेतकरी आणि मजुरांच्या बाबतीत व्यवहार घडत असतो.

परंपरा कायम मात्र, सालगड्याच्या मजूरीत वाढ :-

काळाच्या ओघात शेतपद्धती मध्ये सुद्धा बदल झालेला आहे. मात्र या बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी काही परंपरा आहे त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यामधील एक परंपरा म्हणजे गुढीपाडवा दिवशी सालगडी ठेवणे. वर्षभरासाठी साळगड्याला किती पैसे देणार हे आज ठरवून सालगडी कामाला सुद्धा सुरुवात केतो. मागील काही वर्षांपूर्वी सालगड्याला ५० हजार रुपये ठरवून दिले जात असत मात्र आता त्यांची वर्षभराची मजुरी लाख रुपयांवर गेलेली आहे. त्यामुळे आता सालगड्यासाठी एवढा पैसे आनायचा कुठून हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

शेतकऱ्यांना गरज मदतीची :

बाजारभावात सारखा चढ उतार होत असल्याने आधीच शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे आणि त्यात आता आधुनिक यंत्र वापरून शेती करण्यासाठी सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. मात्र कोणीही समोर येत नसल्याने शेतकऱ्याच्या दिवसेंदिवस समस्या या वाढतच चालल्या आहेत.

English Summary: On the eve of Gudipadva festival, farmers are keeping old traditions - Salgadi is still alive in the fields.
Published on: 03 April 2022, 05:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)