वेळ अमावस्या म्हणले की काळ्या आईच्या पूजेचा सण जो शेकऱ्यांसाठी तसेच ग्रामीण भागात या सणाला महत्वाचे स्थान आहे. या दिवशी लहान मुले, महिला तसेच पुरुष एकत्र येऊन शेतशिवारात जाऊन पांडवांची पूजा करून आनंद साजरा करतात. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोनाचा सावट असल्याने हा सण थांबला आहे. यावेळी प्रशासनाने अजूनही कोणते निर्बंध लादले नसल्यामुळे दोन वर्षानंतर हा सण उत्सहात साजरा होणार आहे.
मराठवाडा विभागातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हा सण रूढी - परंपरानुसार चालत आला आहे. आज शहरात शांतता तर शेतात पूजा करण्यासाठी नागरिकांची गर्दी तसेच बच्चे कंपनीचा किलबिलाट राहणार आहे.
नेमके काय असते दिवसभर :-
शेतामध्ये शेतपिकाचे उत्पादन चांगल्या प्रकारे निघावे यासाठी शेतकरी वेळ अमावस्या दिवशी मनापासून काळ्या आईची पूजा करतात. मागील दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे जे की जिकडे तिकडे बघावे तिकडे शेतशिवार हिरवेगार दिसत आहे.
अमावस्या दिवशी वेगवेगळे पदार्थ असल्याने खाण्याची मेजवानी असते. खाण्याच्या पदार्थांमध्ये आंबील, गव्हाची खीर, भज्जी, अंडे, धपाटे, शेंगा चटणी, वरण इ. पदार्थ असतात. मागील अनेक वर्षांपासून मराठवाडा विभागात लातूर, उस्मानाबाद तसेच परळीमध्ये शेतकऱ्यांनी ही परंपरा जोपासली आहे.
नैसर्गिक संकटानंतरही शेतकऱ्यांमध्ये उत्साह कायम :-
यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान रब्बी हंगामात भरून काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता मात्र नंतर अवकाळी पाऊसाचे संकट राहिले गेले.
आताच्या स्थितीला रब्बी हंगामाची पिके कुठेतरी बहरत आहेत मात्र हा निसर्गाचा लहरीपणा बघता उत्पादन वाढीवर काय परिणाम होतोय हा प्रश्न सर्वांच्या पुढे उपस्थित राहिला आहे मात्र शेतकऱ्यांचा उत्साह आज चांगल्या प्रकारे आहे. आज होणाऱ्या वेळ अमावस्या च्या दरम्यान शेतकरी आपल्या आपल्या शिवारात जाऊन सण साजरा करत आहेत.
काळजी घेण्याचे आवाहन :-
लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्याच्या दिवशी सर्वांना शासकीय सुट्टी दिली जाते परंतु यावर्षी या सण रविवारी आला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे आणि त्यात हा सण असल्याने शेतात जास्त जमावबंदी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांनी ५० पेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी करून नये असे आवाहन केले आहे.
Published on: 03 January 2022, 01:23 IST