News

Central Government: शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनास 26 नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. शेतकऱ्यांनी मोदी सरकारला तीन शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यास भाग पाडले होते. यावेली सरकारनं आंदोलक शेतकऱ्यांना आश्वासने दिली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अद्याप केंद्र सरकारनं दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळं पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Updated on 19 November, 2022 11:09 AM IST

Central Government: शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनास 26 नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. शेतकऱ्यांनी मोदी सरकारला तीन शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यास भाग पाडले होते. यावेली सरकारनं आंदोलक शेतकऱ्यांना आश्वासने दिली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अद्याप केंद्र सरकारनं दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळं पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

शेतकरी पुन्हा एकदा शेतकरी संयुक्‍त किसान मोर्चाच्या व्यासपीठावर आंदोलनाची तयारी करत आहेत. यासाठी येत्या 26 नोव्हेबरला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह तालुक्‍यात आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी राष्ट्रपतींना निवेदने पाठवावीत असे आवाहन महाराष्ट्र किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती किसान सभेचे नेते राजन क्षीरसागर यांनी दिली.

कर्मचाऱ्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार, सरकारने केली मोठी घोषणा

काय आहेत मागण्या?

१) स्वामिनाथन आयोगाच्या सूत्रानुसार उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के मुनाफा या प्रमाणे शेतीमालाला किमान आधारभूत किमती मिळण्याचा अधिकार शेतकऱ्यांना देणारा कायदा करण्यात आलेला नाही.
२) शेतकऱ्यांवर अन्याय लादणारे वीज विधेयक मागे घेण्याचे आश्वासन असताना पुन्हा नव्याने संसदेत सादर केले आहे.
३) लाखो कोटींची कार्पोरेट कर्जमाफी केली जात असताना शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी दिली जात नाही
४) नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी उद्‌ध्वस्त असताना NDRF निकष बदलून शेतकऱ्यांना रास्त भरपाई दिली जात नाही.
५) किसान पेन्शन योजना सुरु करून प्रतिमाह 5000 रुपये लागू करावी
६) देशभरातील सर्व आंदोलक शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले फौजदारी खटले रद्द करावेत
७) शेतकरी आंदोलनातील शहीद, मृत्यू घडलेल्या कुटुंबांना नुकसान भरपाई अदा करा.
८) सदोष पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी कार्पोरेट कंपन्या उचलत आहेत. पीकविमा योजनेत आमूलाग्र बदल करा

डिसेंबर महिन्यात 3 राशींना होणार लाभ; सर्व इच्छा पूर्ण होतील

या संबंधीच्या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळं येत्या 26 नोव्हेंबरला जिल्हा, तालुका स्तरावर आंदोलन करुन राष्ट्रपतींना निवेदने पाठवण्यात येणार आहेत.

तसेच 19 नोव्हेंबर रोजी शेतकरी विरोधी कायदे मागे घेतल्याच्या घटनेस एक वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल अनेक ठिकाणी विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 28 विविध संघटना सहभागी होणार आहेत.

कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा वाढणार, 8 व्या वेतन आयोगाबाबत आली ही मोठी अपडेट

English Summary: On November 26, state-wide agitation against the government
Published on: 19 November 2022, 11:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)