आता शेतकऱ्यांवर येणार आहे आर्थिक भार; ज्याचा माल त्याचीच हमाली केली बंधनकारक केली आहे
कामगार आयुक्तांनी कामगार वाहतूक संघटनेच्या मागणीनुसार कामगारांसाठी ‘ज्याचा माल त्यानेच द्यावी हमाली’ असा निर्णय घेतला असून या निर्णयाने कामगार वर्गात आनंद झाला असून याची झळ शेतकरी वर्गाला बसणार आहे. याचे परिपत्रक १४ जानेवारी पर्यंत कामगार आयुक्तांकडे पाठवले जाईल.
आतापर्यंत शेतावरून बाजारपेठेत जाणाऱ्या मालाच्या वाहतुकीसाठी भराई आणि वराई चा म्हणजेच हमालीचा आर्थिक ताण हा वाहतूकदारांना सहन करावा लागत होता.
यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्याचा माल त्यानेच हमाली अदा करण्याची मागणी वाहतूक कामगार संघटनेकडून केली जात होती.
ही मागणी पूर्ण न झाल्यास मुंबई आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील कामगार संघटनेकडून देण्यात आला होता. यासाठीच कामगार आयुक्तांनी लवकरात लवकर हा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आर्थिक भार
या निर्णयाने कामगार वर्गाला दिलासा मिळाला आहे ; मात्र ही हमाली देण्याची जबाबदारी आता व्यापारी व शेतकरी (farmers) यांच्यावर आली आहे.
या निर्णयाने वाहतूक कामगारांची सुटका झाली असली तरी शेतकरी वर्गाला मात्र हा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
कामगार आयुक्तांनी कामगार वाहतूक संघटनेच्या मागणीनुसार कामगारांसाठी ‘ज्याचा माल त्यानेच द्यावी हमाली’ असा निर्णय घेतला असून या निर्णयाने कामगार वर्गात आनंद झाला असून याची झळ शेतकरी वर्गाला नक्कीच बसणार आहे.
Published on: 15 January 2022, 09:22 IST