दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. आपल्या रोजच्या आहाराला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहे त्यांच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढत होत निघाली आहे.या वाढत्या किमतीला फक्त उत्पादनात घट हेच कारण नाही तर इंधन दरवाढ हे सुद्धा कारण आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतच चालले असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे. आपल्या आहारात ज्या आपण डाळी वापरतो त्या डाळींना सुद्धा महागाईचा झटका बसलेला आहे. जसे की मसूर डाळीचा दर वगळता बाकी सर्व डाळींचे दर शंभर रुपये च्या पुढे गेले आहेत. आधीच निसर्गाच्या अनियमितपणामुळे उडीद आणि तूर डाळीच्या उत्पादनात घट झालेली आहे आणि त्यात आता इतर गोष्टींच्या महागाईमुळे अजून डाळींच्या किंमतीवर भर पडलेली आहे. सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलेली आहे.
डाळींच्या उत्पादनात घट :-
खरीप हंगामातील पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा जसा परिणाम झाला होता त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे चांगलेच नुकसान झाले होते. अगदी खरिपातील पिके जोमात असताना अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट झालेली आहे. अगदी महाराष्ट्रात जसे डाळीच्या उत्पादनात घट झालेली आहे त्याचप्रकारे मध्यप्रदेश राज्यात सुद्धा डाळीच्या उत्पादनात घट झाली आहे. सध्या बाजारपेठेत पाहायला गेले तर डाळीची आयात ही मध्यम प्रमाणत झालेली आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात अजून डाळीचे दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
मुंबई एपीएमसी मध्ये कसे बदलले दराचे चित्र :-
मागील दोन महिन्यांपासून डाळींच्या दरात झपाट्याने वाढ झालेली आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी मुंबई च्या बाजार समितीमध्ये तूर डाळीला ७५ ते ९५ रुपये किलो असा दर होता तर आता हाच दर ८५ ते १०५ रुपये किलो वर गेलेला आहे.किरकोळ बाजारपेठेत तूर डाळीचा दर ११० रुपये किलो तर उडीदडाळ सुद्धा ११० रुपये किलो व मुग डाळीचा दर ११० ते १२० रुपयांच्या दरम्यान आहे. मसुरी च्या डाळीचे दर मात्र नियंत्रणात आहेत.मसूर डाळीचा दर ८५ ते ९५ रुपये किलो दरम्यान आहे. यर यंदा हरभरा पिकाचे उत्पादन वाढले असल्यामुळे त्याचे दर कमी झाले आहेत. चना डाळ ही ६० ते ६५ रुपये किलो विकली जात होती तर आता त्याचा प्रति किलो चा दर ५८ ते ६३ रुपये आहे.
सध्या होलसेल मार्केट मध्ये जर तूर डाळीचे भाव बघायला गेले तर ८५ ते १०५ रुपये प्रति किलो दरम्यान आहेत तर तेच भाव किरकोळ मार्केट पाहायला गेले तर १०० ते ११० रुपये किलो आहेत. होलसेल मार्केट मध्ये मुग डाळीचा भाव ८५ ते १०५ रुपये किलो आहे तर किरकोळ मार्केट मध्ये १०० ते १२० रुपये किलो आहे.होलसेल मार्केट मध्ये उडीद डाळीचा दर ८० ते १०० रुपये प्रति किलो आहे तर किरकोळ मार्केट मध्ये १०० ते ११० रुपये किलो आहे. भविष्यात अजून दर वाढतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
Published on: 12 April 2022, 03:46 IST