रशिया आणि युक्रेन च्या युद्धामुळे आपणास अनेक गोष्टीवर परिणाम बघायला मिळत आहे जे की हा परिणाम सर्वसामान्य वर्गाच्या किचनवर झालेला आहे. भारत देश हा युक्रेनमधून खाद्यतेल आयात करतो. सध्या दोन्ही देशात युद्धाच्या तणावामुळे खाद्यतेलाची आयात बंद आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठा प्रमाणत साठवणूक केल्याची शक्यता आहे. एकेकाळी पामतेल २० ते २५ रुपये प्रति किलो मिळत होते जे की आता तेच पामतेल शेंगदाणा तेलाच्या किमतीत भेटत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमताच हे घडले आहे असे तज्ञ सांगतात.
युद्धाच्या दहाव्या दिवशी ही परिस्थिती, आगामी काळात काय?
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या दहाव्या दिवशी आपणास खाद्यतेलाच्या दराची तडजोड पाहायला भेटत आहे. जे की अजूनही हे युद्ध थांबण्याचे नाव काढत नाही त्यामुळे पुढच्या काळात सरकारने दरावर नियंत्रण आणावे लागणार आहे. युद्धाच्या परिस्थितीचा फायदा काही भागातील व्यापारी वर्ग उचलत आहे जे की साठवणूक करत आहेत. पामतेल, सरकी तसेच सोयबिन तेलाकडे आपण हलक्या प्रतीचे तेल म्हणून पाहत असतो तसेच शेंगदाणा, करडी तेलाकडे आपण उच्च तेल म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्यामुळे जे उच्च तेल आहे त्याचे भाव नेहमी आसमानी च राहिले आहेत.
४० ते ५० वर्षात जे नाही घडले ते आता घडतंय :-
पाठीमागील ४० ते ५० वर्षात आज जे घडतंय ते कधीच घडले नाही. कारण सामान्य नागरिक मागच्या काळात उच्च तेलाला प्रधान्य देत असत त्यामुळे शेंगदाणा तेलाला मागणी जास्तच होती जे की यामुळे तेलाचे भाव तेजीत असायचे मात्र आज युद्धाच्या परिस्थितीमुळे पामतेलाची टंचाई भासत आहे त्यामुळे आजच्या स्थितीला पामतेलाची भाव देखील शेंगदाणा तेलाच्या किंमतीएवढे झाले आहेत. सरकारला यावर नियंत्रण मिळवावे लागणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मोठी बाजारपेठ आहे. जे की खामगाव मध्ये अनेक तेलनिर्मिती करणारे कारखाने आहेत. मागील दोन दिवसांपासून तेलाचे वाढणारे जे भाव आहे त्याची चर्चा सर्वत्र चालू आहे.
सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं :-
मागील महिन्यात २४ तारखेला रशिया आणि युक्रेन देशात युद्ध सुरू झाले जे की तणावाच्या परिस्थितीमुळे युक्रेन आणि रशियामधून जे भारताला खाद्यतेल येत होते ते बंद झाले. शेंगदाणा तेलाची निर्यात ही बंद पडली त्यामुळे शेंगदाणा तेलाचे सुद्धा भाव वाढले सोबतच पामतेलाने सुद्धा शेंगदाना तेलाच्या दराची बरोबरी केली. युद्धामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढी सर्वसामान्यांच्या खिशाला ताप बनलेली आहे. मात्र आता सरकारने यावर नियंत्रण मिळवून सर्वसामान्य वर्गाला दिलासा द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे.
Published on: 07 March 2022, 01:06 IST