News

महाराष्ट्रात सध्या रब्बी ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत. ऊस, फळबागा, भाजीपाला गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढत आहे.

Updated on 18 January, 2022 10:31 AM IST

मुंबई, दि. 17 : महाराष्ट्रात सध्या रब्बी ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत. ऊस, फळबागा, भाजीपाला गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढत आहे. त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी रासायनिक खत विक्रेत्यांना केले आहे. तसेच याबाबत कृषी विभागानेही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे खत पुरवठादारांनी त्यांच्याकडील जुना खत साठा त्याच दराने विक्री करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे दरम्यान, याबाबत कृषीमंत्री श्री. भुसे यांनी नुकतीच केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मंडाविया यांना पत्र लिहून खत विक्री दर नियंत्रित करण्याची मागणी केली होती.

राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रती ५० किलो बॅगचा खतनिहाय दर, खत कंपनीचे नाव खालीलप्रमाणे (कंसात नमूद दर दि. १३ जानेवारी,२०२२ रोजीचे)

१०:२६:२६- स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज -१४४० (१६४०). वाढ: १७० रुपये

१०:२६:२६ - चंबल फर्टीलाईझर्स लि.-१४६५ (१५००), वाढ: ३५ रुपये

१२:३२:१६- स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज -१४४० (१६४०) वाढ: १५० रुपये

१६:२०:०:१३ - कोरोमंडळ इंट. लि.

१०७५ (१२५०) वाढ: १७५ रुपये

अमोनियम सल्फेट: गुजरात स्टेट फर्टी. कंपनी- ८७५ (१०००) वाढ: १२५

१५:१५:१५:०९ - कोरोमंडळ इंट. लि.

११८० (१३७५ ) वाढ:१९५.

English Summary: Old price sell to Farmer fertilizer dadaji bhuse
Published on: 18 January 2022, 10:31 IST