राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhgat Singh Koshyari) यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे (NCP leader Rupali Patil-Thombare) यांनी राज्यपाल यांचा चांगलाच समाचार घेतलाआहे.
मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती माणसे गेली तर मुंबईत काय उरेल? असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल यांनी केले, यावरून राजकीय नते राज्यपालांवर जोरदार टीका करीत असताना पाहायला मिळाले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil-Thombare) यांनी जोरदार टीका केली आहे.
हे ही वाचा
Cotton Varieties: देशी कापसाचे नवीन वाण 160 दिवसात तयार; जाणून घ्या 'या' वाणाविषयी
"राज्यपाल (Governor) हे भाज्यपाल आहेत. भाज्यपाल राज्यपालांनी पदावरून पायउतार व्हावे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. त्यामुळे माफी नको, राज्यपालांनी पदावरून दूर व्हावे. राज्यपालांच्या वक्तव्यामागे भाजप आहे, असा आरोप करत म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करावी" अशी जोरदार टीका यावेळी त्यांनी केली.
हे ही वाचा
Crop Insurance Scheme: पीकविम्याचे धोरण बदलले; शेतकऱ्यांना होणार 'हा' मोठा फायदा, जाणून घ्या..
राज्यपालांच्या या वक्तव्यावर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली, त्यात राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी असंही म्हणत उद्धव ठाकरेंनीही राज्यपालावंर टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपण राज्यपालांच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र हा मराठी माणसाच्या घामातून आणि परिश्रमातून उभा राहिला आहे, असंही फडणवीस म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (CM Eknath shinde) देखील राज्यपालांच्या या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Common People: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; 1 ऑगस्टपासून होणार हे 'पाच' बदल
Monkeypox: 'या' देशात मंकीपॉक्सचा दुसरा बळी; जगभरात आढळले 20 हजारांहून रुग्ण
Horoscope: 'या' 4 राशीचे लोक असतात खूप सरळ स्वभावाचे; जाणून घ्या 'या' राशीविषयी
Published on: 31 July 2022, 12:17 IST