गेल्या वर्षभरात कोरोनाने(corona) संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची आणि आपल्या देशाची सुद्धा अर्थव्यवस्था चांगलीच डबघाईला आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर बेरोजगारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.आपल्या रोजच्या जीवनात तेलाचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. तेल हे दैनंदिन जीवनातील एक उपयोगी आणि आवश्यक घटक सुद्धा मानला जातो.
मोहरी तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ:-
भारतातील खाद्य तेलांच्या आयात शुल्काच्या वाढीमुळे पर राष्ट्रीय देशात खाद्यतेलांच्या किमतीमध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिल्ली तेल आणि तेलबिया बाजारातही दिसून आला आहे. तसेच तेलाची मागणी वाढल्यामुळे मोहरी तेल आणि शेंगदाणे तेल तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया आणि कापूस तेलाचे भाव चांगलेच सुधारले आहेत तसेच वधारले आहेत.सरकारने तेल आयात शुल्क मूल्याच्या तुलनेत डॉलर-रुपया विनिमय दर कमी करून 74.40 रुपये प्रति डॉलर केला. सरकारच्या या निर्णयामुळे कच्च्या पाम तेलाची आयात शुल्क किंमत 20,807 रुपये प्रति टन या प्रमाणे झाली आहे.
हेही वाचा:या 4 योजनेतून मच्छिमारांना घेता येणार मोठा लाभ, होणार लाखोंची कमाई
त्यामुळे खाद्यतेल (oil) या मध्ये प्रति टनाच्या मागे चक्क 125 पेक्षा जास्त रुपयांची वाढ झालेली दिसून येते. तर सोयाबीन तेलाची आयात शुल्क किंमत 24,450 रुपये प्रति एक टन आणि पामोलिन तेलाची किंमत 30,930 रुपये प्रति एक टन होती एवढी होती. त्यामुळे तेलाचे दर वाढले आहेत.सणासुदीच्या काळात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो कारण वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यासाठी तेलाचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो. परंतु या वर्षी सणासुदीच्या तोंडालाच मोहरीच्या तेलाचे दर चांगलेच वधारले आहेत.या वर्षी मोहरीचे उत्पन्न हे खूपच कमी प्रमाणात निघाले आहे. त्यामुळे मोहरीच्या कमी साठयामुळे त्याचे दर सुद्धा भरमसाठ वाढले आहेत.
राजस्थान मधील मोहरीचे कच्चे तेल घाणे 18300 रुपये क्विंटल या भावाने विकत घेत आहेत. त्या मुळे अगदी सणासुदीच्या काळात मोहरीच्या तेलाचे दर वाढले आहेत. मोहरीच्या वायदा व्यापारात सुद्धा 120 रुपये क्विंटलचे नुकसान होऊनही, मोहरीच्या किमती स्पॉट मार्केटमध्ये मागील स्तरावर बंद झाल्या. आपल्या देशातील तेलाच्या मंडईंमध्ये मोहरी तेलाची आवक 2.25 लाख पिशव्यांवरून दोन लाख पिशव्यांवर आली आहे.त्यामुळे तेलाचे भाव वाढले आहेत. त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात मागणी वाढल्यामुळे शेंगदाणे तेल, तेलबिया आणि कापूस बियाण्याच्या किंमतीतही वाढ झालेली दिसून येत आहे.
Published on: 18 September 2021, 11:58 IST