बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात कृषी विभागामध्ये कृषी सिंचन साहित्य वाटपामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्यामुळे कृषी विभागांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून संबंधित अधिकृत कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागामार्फत सिंचनातून समृद्धी आणि पाण्याची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान कृषी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन लाभ दिला जातो. योजनेमध्ये लाखो रुपयाचा घोटाळा झाल्याचे पहायला मिळत आहे.It is seen that there has been a scam of lakhs of rupees in the scheme.कृषी विभागाच्या मोका पहाणीमध्ये घोटाळा उघडकीस आलाअसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
कृषी विभागात महाडीबीटी व पोकरा या योजनेच्या अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन लाभ घेण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आले होते. त्याला कृषी विभागाकडून पूर्वसंमती देण्यात आली होती. याच पूर्वसंमतीचा फायदा काही ठिबक विक्रेते व संबंधित शेतकऱ्यांनी आर्थिक फायदा घेण्यासाठी कंपनीचे ऑनलाईन हुबेहूब बिल सादर केले.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना २०२१-२२ अंतर्गत अनुदान वितरणात हा गंभीर प्रकार समोर आला. तालुका कृषी विभागाकडून १४ जुलैला वरिष्ठ कार्यालयाला सदर घटने संदर्भात माहिती देण्यात आली होती.त्यानंतर कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून तपासणी आदेश देण्यात आले होते. जिल्हा कृषी
अधीक्षक नरेंद्र नाईक यांनी२७ जुलैला सुनावणी घेतली होती. सुनावणी मध्ये संबंधित ठिबक विक्रेत्याकडून सुमारे ३५ लाख ७२ हजार ७७१ रुपयांची वसुली करण्याचे निर्देश जिल्हा अधिक्षकांनी दिले होते.तसेच या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची चौकशी करून तातडीने अहवाल देण्याचे आदेशउपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना
देण्यात आले आहे. संबधीत विक्रेत्याकडील असलेला ठिबक तुषार सिंचनचा असलेला साठा व विक्री करण्यात आलेला साठा यामध्ये मोठ्याप्रमाणात तफावत आढळून आली असल्याचे कृषी विभागांच्या तपासणीमध्ये निष्पन्न झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे विक्रेत्या बरोबरच संबंधित कर्मचाऱ्यांवर काय ?कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 03 August 2022, 12:54 IST