News

पुणे शहरातील तापमानचा आलेख चांगलाचा वाढला आहे. आता पुण्याचे तापमान ३२.४ अंशावर पोहचले आहे. पुण्याप्रमाणे मुंबईतील तापमानाचा आलेख वर चढत आहे. मुंबईचे तापमान ३२.२ अंशावर पोहचले आहे.

Updated on 07 October, 2023 1:22 PM IST

Pune News : मुंबई, पुण्यातून मान्सून परतीचा प्रवास झाला आहे. तसंच राज्याच्या इतर भागातूनही मान्सून परतत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. परतीचा प्रवास जवळपास पूर्ण होत असल्याने राज्यात आता ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. यामुळे नागरिकांना आता उष्णतेचा सामना करावा लागत आहे. तसंच आणखी ऑक्टोबर हिट वाढण्याची शक्यता आहे.

पुणे शहरातील तापमानचा आलेख चांगलाचा वाढला आहे. आता पुण्याचे तापमान ३२.४ अंशावर पोहचले आहे. पुण्याप्रमाणे मुंबईतील तापमानाचा आलेख वर चढत आहे. मुंबईचे तापमान ३२.२ अंशावर पोहचले आहे.

पुढील ४८ तासात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा ऑक्टोबरची हिट चांगलेच चटके देण्याची शक्यता आहे. तसेच पहाटेच्या वेळी गारवा राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

यावर्षी राज्यात पावसाने ओढ दिली आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तसेच राज्यात पावसाने अतिशय उशिराने एन्ट्री मारली. त्यानंतर पाऊस चांगलाच बरसला. काही दिवस बरसला.

त्यानंतर पुन्हा त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर तो पुन्हा आला. पण नंतर ऑगस्ट महिन्यात त्याने जी सुट्टी घेतली तो शेवटपर्यंत आलाच नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले. आता मात्र परतीच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांना चांगला दिलासा मिळाला. मात्र अजूनही पावसाची गरज आहे.

English Summary: October hits increase in state What else will the weather change
Published on: 07 October 2023, 01:22 IST