News

सण २०१८ पासून राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर २० तालुक्यामध्ये ई - पिक पाहणीचा कार्यक्रम राबविण्यात आलेला होता जो की हा पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे सरकार ई - पीक पाहणी कार्यक्रम सर्व जिल्हा स्तरावर राबिवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अत्ता त्यांचा सात बारा अचूक व त्यांच्या सोयीप्रमाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांनी दिलेली आहे.

Updated on 05 August, 2021 9:24 PM IST

सण २०१८ पासून राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर २० तालुक्यामध्ये ई - पिक पाहणीचा कार्यक्रम राबविण्यात आलेला होता जो की  हा  पीक  पाहणी  कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे सरकार ई - पीक पाहणी कार्यक्रम सर्व जिल्हा स्तरावर राबिवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना  अत्ता  त्यांचा  सात  बारा  अचूक व त्यांच्या सोयीप्रमाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांनी दिलेली आहे.

ई -पीक पाहणी करण्यासाठी त्या प्रकल्पाची ओळख त्याचे महत्व तसेच उद्देश व चालू खरीप हंगामात मोबाईल ॲपद्वारे मोजणीची पूर्व तयारी व अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.ही कार्यशाळा ज्यावेळी आयोजित करण्यात येणार होती त्यावेळी तिथे उपस्थित अधिकरी वर्ग जे की जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, महसूल सहायक अधीक्षक हर्षदा काकड, जिल्हा  हेल्प  डेस्कचे  प्रसाद  रानडे, महसूल  सहायक हितेश राऊत उपस्थित होते.

हेही वाचा:ब्रम्हपुरीचा "उकड्याला" परदेशातून मागणी, रोज ५०० टन तांदूळ विदेशात

आता २५० पिकांची होणार नोंद :

यापूर्वी सातबारा उताऱ्यावर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस, मका, सोयाबीन या पिकांसह २० पिकांची नोंदणी केली जायची परंतु अत्ता ई - पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे शेतकरी पिकांचे फोटो काढून अपलोड करत आहेत.त्यामुळे आत्ता २५० पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे जे की या पद्धतीमुळे आत्ता शासनाला  पिकांची  अचूक  माहिती भेटणार आहे  व  गावनिहाय  पिकांची  आकडेवारी सु द्धा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण  भागामध्ये गावपातळीवर महसुली लेखी ठेवण्याकरिता विविध गावे, नमुने व दुय्यम नोंदवह्या तयार करण्यात आलेल्या आहेत यामधील गावचा नमुना सात हा अधिकारी अभिलेख विषयक असून गाव नमुना नंबर बारा पिकांची नोंदवही ठेवण्या संदर्भात आहे.

शेतकरी करू शकतात फोटो अपलोड:-

भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी गाव नमुना बारा मधील पिकांच्या नोंदी अद्यावत करण्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित केलेले आहे. या विकसित झालेल्या ॲपमुळे शेतकरी अत्ता प्रत्यक्षपणे त्यांच्या शेतात जाऊन मोबाइल ॲपद्वारे आपल्या पिकाचे फोटो अपलोड करू शकतात. या ॲपमध्ये अक्षांश तसेच रेखांश ची नोंद होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमधील स्थान सुद्धा  तलाठ्याला कळणार आहे.  या मोबाईलच्या ॲपमध्ये पिकांची वर्गवारी  सेट करण्यात आलेली असून यामध्ये कमीत कमी १८ वर्ग तयार करण्यात आलेले आहेत. पॉली हाऊस मधील पिके तसेच कडधान्य, तृणधान्य, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती यांचा समावेश सुद्धा आहे जे की यासह या ॲपमध्ये ५८० पिकांच्या नोंदी घेणार येणार आहेत.

English Summary: Now you will get the exact information of the crops land
Published on: 05 August 2021, 09:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)