News

एका संशोधकाने अशी एक सिस्टीम तयार केली आहे, ज्याने क्षणोक्षणी घडणाऱ्या हवामान बदलाचे अपडेट मिळतील आणि अलर्ट देणारी माहिती मिळणार आहे. यवतमाळ येथील वरद विश्वरूपे यांनी 'झोन स्पेसिफिक वेदर मॉनिटरिंग सिस्टीम' तयार केली आहे.

Updated on 19 January, 2022 10:06 AM IST

तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामान विभागाचे अंदाज आता बऱ्यापैकी बरोबर येऊ लागले आहेत आणि त्याचा लाभही होत आहे . मात्र, आताही मर्यादा आहे ती वेळेवर अपडेट मिळण्याची. सॅटेलाईट बेस्ड सेन्सरने मोबाईलवर तापमानाचे आकडे मिळतात पण माहिती नाही. आयआयटी स्कॉलर मात्र, एका संशोधकाने अशी एक सिस्टीम तयार केली आहे, ज्याने क्षणोक्षणी घडणाऱ्या हवामान बदलाचे अपडेट मिळतील आणि अलर्ट देणारी माहिती मिळणार आहे.

यवतमाळ येथील वरद विश्वरूपे यांनी 'झोन स्पेसिफिक वेदर मॉनिटरिंग सिस्टीम' तयार केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि एम्बडेड अल्गोरिदम यांचे समीकरण असलेल्या सिस्टीमला ऑस्ट्रेलियन सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे. वरद यांनी या नव्या डिव्हाईसची माहिती दिली.

विशेष म्हणजे त्याच्या संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारकडून पेटंटही मिळाले आहे. उन, वारा, पावसाचे कोणत्याही गावातील क्षणोक्षणी अपडेट्स मिळवणारे त्याचे हे संशोधन गावखेड्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे. सध्या हवामानाचा अंदाज रडार, साेनार आणि उपग्रहाद्वारे काढला जाताे. या नव्या सिस्टीममध्ये याची गरज नाही. हे डिव्हाईस आपल्याला शहरातील टेलिकाम टाॅवरवर फिट करता येईल.

टाॅवरच्या जीपीएस प्रणालीद्वारे हे चालेल. एका सिस्टीममध्ये सहा संयत्र जाेडता येईल आणि यासाठी केवळ ८ ते १० हजार रुपये खर्च येईल. सिस्टीमद्वारे तुमच्या माेबाईलवर मॅसेज जाईल. यासाठी ॲन्ड्राईड माेबाईलची गरज नाही, साध्या जीएसएम माेबाईलवरही ताे मॅसेज जाऊ शकेल. प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात पुणे, बंगळुरू व लंडनमध्ये जाऊन त्यांनी दाेन वर्ष अभ्यास केल्यावर हे संशोधन जाहीर केले. या प्रयाेगाला 'आयईईई'चा २०१५-१६ चा बेस्ट पेपर अवाॅर्ड प्राप्त झाला आहे.

वेदर मॉनिटरिंग सिस्टीमची वैशिष्ट्ये

1. सिस्टीममधील अपडेट, दुरुस्ती अगदी रिमाेट सेन्सिंगद्वारे घरी बसून किंवा आर-पार तंत्रज्ञानाने परदेशातूनही करता येणार आहे.

2. 'हायब्रीड हेक्जॅगाेनल एनर्जी एफिशियंट' (एच-२ ई-२) प्रमाणे विकसित. आसपासच्या वस्त्यांमध्ये हवामानात हाेणाऱ्या बदलाची अचूक माहिती मिळणार आहे.

3. डिव्हाईस बॅटरीवर आधारित असेल व किमान वर्षभर चालू राहील.

4. अमेरिकेच्या 'रास्पबेरी पाय', 'बीगल बाेन ब्लॅक' आणि इटलीच्या 'आर-ड्युनाे' मायक्राे काॅम्प्युटर तंत्राचा आधारावर सिस्टिम तयार आहे.

5. या सिस्टीमच्या मदतीने ट्रॅफिक जामचेही अपडेटही घेता येईल. यासाठी केवळ सेन्सर कॅमेरा लावून सिस्टीममध्ये थाेडे बदल करावे लागेल.

वरद विश्वरूपे यांनी नागपुरातून बारावी केल्यानंतर एमआयटी पुणे येथून आयआयटी केले. जागतिक पातळीवर त्यांचे एकूण १८ पेपर प्रकाशित झाले आहेत. चार पेटंटही त्यांच्या नावावर आहेत. सध्या डाॅ. विवेक विश्वरुपे अमेझॉन रिसर्च इंडिया येथे डेटा सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील डाॅ. विवेक विश्वरुपे यवतमाळच्या अमाेलकचंद महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.

अचानक येणाऱ्या पावसामुळे किंवा हवामानाच्या इतर बदलामुळे पुढे हाेणारे नुकसान पूर्वसूचनेमुळे टाळता येईल. सिस्टीम आलार्मप्रमाणे अलर्ट देईल. पिकाची नासधूस करणाऱ्या जनावरांच्या हल्ल्याची माहितीही सिस्टीमद्वारे मिळेल, असा दावा वरद विश्वरूपे यांनी केला.

English Summary: Now you will get instant updates of wool, wind, rain; The 24-year-old researcher made the discovery, a boon for farmers
Published on: 19 January 2022, 10:06 IST