News

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार जमिनीच्या नोंदी आता डिजिटल ठेवल्या जाणार असून येत्या काही दिवसांत एका क्लिकवर जमीनीची संपूर्ण महिती मिळणार आहे.

Updated on 03 February, 2022 12:21 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार जमिनीच्या नोंदी आता डिजिटल ठेवल्या जाणार असून येत्या काही दिवसांत एका क्लिकवर जमीनीची संपूर्ण महिती मिळणार आहे. देशातील जमिनींचा डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे.

आता आधार नंबरच्या धर्तीवर जमिनींसाठी देखील युनिक रजिस्टर्ड नंबर जारी केला जाणार आहे. जमिनींसाठीही आता आधार क्रमांक दिला जाणार आहे. यासाठी आयपी तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. 2023 पर्यंत जमिनींच्या डिजिटल नोंदी करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. यानुसार तुमच्या जमिनीला 14 अंकी युनिक ULPIN नंबर दिला जाईल.

ULPIN क्रमांकाद्वारे देशात कुठेही जमीन खरेदी-विक्री करता येईल. जमीन विक्रेता आणि खरेदीदार यांची माहिती मिळणार आहे. जमिनीचे विभाजन झाल्यास किंवा खरेदी-विक्री झाल्यास नव्या तुकड्याचा क्रमांक वेगळा असणार आहे. या डिजिटल लँड रेकॉर्डमुळे पुढच्या काही दिवसांत फक्त एका क्लीकवर जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि माहिती मिळू शकणार आहे.

English Summary: Now you will get 'Aadhaar number' for land; All the information you will get with one click, a big decision of the government
Published on: 03 February 2022, 12:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)