News

प्रत्येक 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला भारतीय राज्यघटनेनुसार मतदान करण्याचा अधिकार आहे. परंतु बऱ्याचदा अजूनही बऱ्याच जणांचे मतदार यादीत नावाची नोंदणी न केल्यामुळे अमूल्य अशा मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतात. बर्यााचदा शासनाकडून मतदान नाव नोंदणी अभियान चालवले जाते.

Updated on 24 November, 2021 9:49 AM IST

प्रत्येक 18  वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला भारतीय राज्यघटनेनुसार मतदान करण्याचा अधिकार आहे. परंतु बऱ्याचदा अजूनही बऱ्याच जणांचे मतदार यादीत नावाची नोंदणी न केल्यामुळे अमूल्य अशा मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतात. बर्‍याचदा शासनाकडून मतदान नाव नोंदणी अभियान चालवले जाते.

 परंतु ग्रामीण भागांमध्ये अशा अभियानाची कधीकधी माहिती देखील मिळत नाही. त्यामुळे मतदान करण्याची दाट इच्छा असून देखील अशा व्यक्तींना मतदानापासून वंचित राहावे लागते.

 परंतु आत्ता काळजी करण्याची गरज नाही, कारण आता मतदार आपल्या नावाचे नाव नोंदणी अगदी आपल्या मोबाईल वर घरच्या घरी करू शकतात. याबाबतची माहिती स्वतः निवडणूक आयोगाने दिली. ट्रू वोटर मोबाईल ॲप द्वारे देखील आता विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदणी करता येईल,अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. मदान यांनी दिली.

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात मतदार, उमेदवार तसेच राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेला सुविधा व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या मदतीने मतदारांना मतदार यादीतील आपले नाव देखील शोधता येते. इतर सुविधा न सोबतच आता मतदारांना आपल्या नावाची नोंद मतदार यादीत या ॲपद्वारे करता येणार आहे.या ॲपच्या माध्यमातून मतदारांच्या नावात किंवा पत्त्यातही दुरुस्ती करता येईल, असे मदान यांनी सांगितले. 

निवडणूक आयोगातर्फे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदवण्याची संधी आहे. या कार्यक्रमानंतर 5 जानेवारी 2022  रोजी विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.(संदर्भ-News18 लोकमत)

English Summary: now you can register your name in voter list by mobile application
Published on: 24 November 2021, 09:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)