News

जागतिक बाजारपेठेत आपला ठसा अनेक वर्षांपासून उमटवणारी मोबाईल उत्पादन क्षेत्रातील मोठी कंपनी

Updated on 11 April, 2022 1:32 PM IST

जागतिक बाजारपेठेत आपला ठसा अनेक वर्षांपासून उमटवणारी मोबाईल उत्पादन क्षेत्रातील मोठी कंपनी Motorola भारतात आपला Moto G22 स्मार्टफोन लॉंच झाल्यानंतर आता ऑनलाईन विक्रीसाठी सज्ज आहे. Moto G22 स्मार्टफोन हा भारतीय ग्राहकांच्या बजेटवर लक्ष केंद्रित करून बनवला गेला आहे.

Moto G22 हा स्मार्टफोन यापूर्वी युरोपियन बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला होता. Apple च्या एज च्या डिजाईनशी मिळतीजुळती डिजाईन मोटो ने दिली आहे. या मोबाईलला 4 GB रॅम-64 जीबी इंटरनल स्टोरेज, 

5000 mAH बॅटरी, 90 HZ रिफ्रेश रेट, 50 MP कॅमेरा ही स्पेसिफिकेशन्स दिली आहेत.Moto G22 या स्मार्टफोनची किंमत सामान्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फारच कमी ठेवली आहे. Motorola ने किंमतीबद्दल अधिकृतपणे माहीती दिली नसली तरी Moto G22 स्मार्टफोन 10,999 रुपयांपर्यंतच्या किंमतीत ऑनलाईन साईटवर मिळण्याची शक्यता आहे.

Moto G22 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 च्या ॲस्पेक्ट रेशोसह 6.5-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले दिला जातो. स्मार्टफोन MediaTek Helio G37 SoC सपोर्ट मिळेल आणि 4GB पर्यंत RAM, 5000 mAH बॅटरी या स्मार्टफोनमध्ये आहे. यामध्ये अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम कंपनीनं दिली आहे. प्रोसेसिंगसाठी ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो G-37 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

ग्राहकांना Moto G22 स्मार्टफोन 13 एप्रिलला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवरून तीन रंगांच्या पर्यायात विकत घेता येणार आहे. एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचे सेन्सर देण्यात आले आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.

English Summary: Now this company is bringing phones just like the iPhone, find out the amazing features
Published on: 11 April 2022, 01:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)