KCC Card :- शेतकरी बंधूंना कुठल्याही हंगामाच्या सुरुवातीला शेतीसाठी वेळेत पैसा हातात असणे खूप गरजेचे असते. कारण बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा बाजारभावात घसरन झाल्यामुळे नको त्या भावात शेतीमाल विकावा लागतो व परिणामी मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. कधी कधी अशी परिस्थिती उद्भवल्याने उत्पादन खर्च सुद्धा निघणे मुश्किल होते.
त्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या हातात कष्ट करून देखील पैसा राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये पीककर्ज किंवा इतर आर्थिक संस्थांकडून कर्ज घेण्याच्या शेतकऱ्यांना पर्याय नसतो. परंतु पीक कर्ज देखील बऱ्याचदा वेळेवर मिळत नाही. या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम हा शेती उत्पादनावर होण्याची शक्यता असते.
ही सगळी परिस्थिती समोर ठेवून शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली असून एक फायदेशीर योजना असून या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते. किसान क्रेडिट कार्ड प्रामुख्याने देशातील सरकारी बँकांच्या माध्यमातून देण्यात येते. परंतु आता देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेली ॲक्सिस बँकेने देखील किसान क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.
ॲक्सिस बँक लॉन्च करणार किसान क्रेडिट कार्ड
या बाबतीचे सविस्तर वृत्त असे की, देशातील सर्वात मोठे खाजगी बँकांपैकी असलेल्या ॲक्सिस बँकेने देखील खास किसान क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली असून रिझर्व बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब या रिझर्व बँक ऑफ इंडियाची उप कंपनी असलेल्या कंपनीच्या सहकार्याने ॲक्सिस बँकेने दोन कर्ज देणारी उत्पादने सुरू केली आहेत.
यापैकी एक म्हणजे ॲक्सिस बँकेचा क्रेडिट कार्ड आणि दुसरे म्हणजे ॲक्सिस बँक एमएसएमइ कर्ज होय.
ॲक्सिस बँक किसान क्रेडिट कार्ड
ॲक्सिस बँक फ्रिक्शनलेस क्रेडिट अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड सुरू करत असून हे कार्ड पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे. विशेष म्हणजे याकरिता ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे देण्याची गरज नाही. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून हे कार्ड लॉन्च केले जाणार असून या पायलट प्रोजेक्ट अंतर्गतच ग्राहकांना 1.6 लाख क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहेत. नेमका या किसान क्रेडिट कार्डचा फायदा ग्राहकांना कसा होईल याचा अभ्यास करून इतर राज्यात देखील ही सुविधा सुरू केली जाणार आहे.
ॲक्सिस बँक एमएसएमई कर्ज
किसान क्रेडिट कार्डच नाही तर ॲक्सिस बँकेने लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी असुरक्षित एमएसएमइ कर्ज उत्पादन सुरू केले असून हेदेखील एक पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया असणार आहे. या कर्ज सुविधेअंतर्गत ग्राहकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे ॲक्सिस बँकेने ही कर्ज उत्पादने हे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या पिटीपीएफसी अंतर्गत लॉन्च केली आहेत. यामुळे ग्राहकांची अगदी सुरक्षित पद्धतीने माहिती मिळणे शक्य होणार आहे. माध्यमातून आता पॅन व्हेलिडेशन, आधार इ केवायसी, अकाउंट ॲग्रीकेटर डेटा आणि जमीन दस्तऐवजांची पडताळणी आणि बँक खाते प्रमाणित करण्याकरिता पेनी ड्रॉप सेवेची सुविधा मिळणार आहे. या अंतर्गत बँकेला अपेक्षा आहे की ग्राहकांना जलद आणि चांगली क्रेडिट सेवा दिली जाईल व त्यानंतर बँक याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणखी नवीन उत्पादने लॉन्च करण्याची शक्यता आहे.
Published on: 24 August 2023, 10:57 IST