कोरोना काळात अनेकदा अंड्याच्या किमतीत चढउतार बघायला मिळत आहेत. सुरुवातीला तर यामध्ये मोठी घसरण झाली होती, मात्र नंतर यामध्ये मोठी वाढ झाली होती, असे असताना आता पुन्हा एकदा अंड्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे ही एक वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना सुखावणारी बातमी आहे. मुंबईत अंड्यांच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. अंड्यांचे दर आज 2 ते 4 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे आता पुढील काही दिवस हे दर असेच काहीसे राहण्याची शक्यता आहे. दरवर्षी थंडीत या दरात कायम तेजी असते. मात्र सध्या थंडी शेवटच्या टप्प्यात आली असताना हे दर कमी झाले आहेत.
सध्या होलसेल मध्ये आजचा दर 66 रुपये डझन आहे तर रिटेल मध्ये 70 रुपये डझन आहे. हेच आधी रिटेल मध्ये 72 रुपये डझन दर होता, एका अंड्याची किंमत आज 4.70 पैसे आहे. तसेच आधीचा भाव हा 5.20 पैसे इतका होता. यामुळे यामध्ये घसरण झाल्याचे दिसून येते. सध्या अंड्याची आवक ही बाजारात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या अंड्यांचे उत्पादन वाढले आहे. अनेक ठिकाणी शेतकरी याकडे वळाले आहेत.
थंडीच्या दिवसांमध्ये अनेकवेळा अंड्यांची मागणी वाढते. बहुतांश कुटूंबांमध्ये अंड्याचा नाश्ट्यासाठी वापर केला जातो. परंतू बाजारात अंड्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अंड्यांचे दर कमी झाले आहेत. मागणी स्थिर असली तरी आवक वाढल्याने हा दर कमी झाला असल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले. मुंबईत अंड्यांची मागणी देखील मोठी असते, असे असताना हे दर कमी झाल्याने दिलासा मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठी महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे. कोरोना काळात अनेकांना रोजगार देखील नाहीत. यामुळे अनेकांचे हाल सुरू आहेत. यामुळे महागाई कमी करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. यामुळे घरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. अंड्याचा आहारात समावेश असल्यास शरीर मजबूत राहते. यामुळे अनेकांच्या आहारात याचा समावेश असतो.
Published on: 28 January 2022, 03:53 IST