आधार कार्ड आजच्या तारखेला महत्वाचे कागदपत्र झाले आहे. सरकारी किंवा खासगी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असते. बँकेच्या कामासाठी हे आधारकार्ड फार महत्वाचे झाले आहे. ओळख पत्र म्हणून याचा उपयोग केला जातो. पण या ओळखपत्रावरील फोटो मात्र आपली ओळख दाखवत नाही.
आधार कार्ड वरचे फोटो जर आपण पाहिले तर व्यवस्थित प्रिंट झालेले नसतात. आधार कार्ड वरचे फोटो व्यवस्थित नसल्यामुळे ते दाखवायला ही इच्छा होत नाही. आपला स्वताचा फोटो पाहून आपल्याला हसू येत असतं. तर काहीजण त्याकडे पाहत सुद्धा नाहीत. आता आधार कार्डवरील तुमचा फोटोही देखणा होणार असून हे कार्ड दाखवण्यासाठी तुम्ही आनंदीही असाल. तुम्ही म्हणत असाल हे कसे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला याच न होणारी गोष्ट कशी होणार आहे याची माहिती देणार आहोत...जर तुमचा आधार कार्ड वरचा फोटो व्यवस्थित प्रिंट झाला नसेल तर तुम्ही तो दोन प्रकारे बदलू शकतात.
जवळच्या आधार केंद्रावर जाऊन फोटो बदलणे
तुम्ही सर्वात आधी युआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळ उघडावे. उघडल्यानंतर गेट आधार मध्ये आधार नोमिनेशन अपडेट फॉर्म डाउनलोड करावा. डाऊनलोड केलेला फॉर्म भरल्यानंतर तुम्ही आधार केंद्रावर जाऊन जमा करा. आधार केंद्रावर गेल्यावर तुमचं बायोमेट्रिक घेतले जाते तसेच फोटो, फिंगरप्रिंट, रेटिना स्कॅन झाल्यानंतर तुमच्या आधार डिटेल्स अपडेट होते.
प्रकार दुसरा- पोस्टाच्या माध्यमातून फोटो बदलणे
सर्वात आधी तुम्ही युआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार कार्ड अपडेट करेक्शन फॉर्म डाऊनलोड करून सर्व माहिती व्यवस्थित भरावी. असंबंधित फॉर्म भरल्यानंतर युआयडीएआयच्या क्षेत्रीय कार्यालयाचे नावे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक लेटर लिहावे.
या पत्राबरोबर फोटो मागे सही करून फोटो फॉर्म सोबत जोडावा. दोन आठवड्याच्या आत मध्ये तुमच्या नवीन फोटो तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मिळतील.
Published on: 25 January 2021, 08:24 IST