News

ग्रामीण भागामध्ये शेतीच्या संबंधित असलेल्या सर्व प्रशासकीय कामांकरिता तलाठी कार्यालय हा एक पर्याय असतो व कुठल्याही प्रकारचे जमिनीच्या संदर्भातील आपले शासकीय काम असेल तर नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये जावे लागते. परंतु बऱ्याचदा तलाठी कार्यालयामध्ये कामे पूर्ण करण्याकरिता नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते.

Updated on 06 August, 2023 7:24 PM IST

 ग्रामीण भागामध्ये शेतीच्या संबंधित असलेल्या सर्व प्रशासकीय कामांकरिता तलाठी कार्यालय हा एक पर्याय असतो व कुठल्याही प्रकारचे जमिनीच्या संदर्भातील आपले शासकीय काम असेल तर नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये जावे लागते. परंतु बऱ्याचदा तलाठी कार्यालयामध्ये  कामे पूर्ण करण्याकरिता नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते.

परंतु आता जर आपण शासनाच्या भूमी अभिलेख विभागाचा विचार केला तर आता अनेक कामे हे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत असल्यामुळे आता वारस नोंद दुरुस्ती किंवा फेरफार आणि इतर महत्त्वाचे काम आहे आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून करता येणार आहेत. सध्या महसूल सप्ताह सुरू असून त्या निमित्ताने संपूर्ण राज्यांमध्ये शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने हे सुविधा सुरू केली आहे.

 आता शेतीसंबंधित ही कामे होतील ऑनलाईन

 बऱ्याचदा एखादी व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या वारसांची नोंद घेण्यासाठी आता नागरिकांना भूमी अभिलेख विभागाचे संकेतस्थळ किंवा महाभुमी या संकेतस्थळावर जाने गरजेचे असून त्या ठिकाणी लॉगिन केल्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या माध्यमातून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो अर्ज संबंधित गावाच्या तलाठी यांच्याकडे जाणार असून तलाठी देखील ऑनलाइन पद्धतीनेच या अर्जाची पडताळणी करतील.

जर या अर्जामध्ये काही चूक किंवा कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्याची माहिती अर्जदाराला ई-मेल च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे. या माध्यमातून आता वारस नोंद, बोजा दाखल किंवा कमी करणे, इ करार नोंदी, मयताचे नाव कमी करणे तसेच अज्ञान पालनकर्ताचे नाव कमी करणे तसेच विश्वस्तांचे नाव कमी करणे आणि सातबारा उताऱ्यावरील चुका दुरुस्त करणे इत्यादी कामे आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

 वारसनोंदीसाठी अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

1- वारस नोंदी करिता ऑनलाईन अर्ज करण्याकरता सर्वप्रथम https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करावे व लॉगिन केल्यानंतर या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. त्यानंतर हा अर्ज गावच्या तलाठ्याकडे जातो व तलाठी या अर्जाच्या ऑनलाइन वेरिफिकेशन करतात.

या वेरिफिकेशन मध्ये जर काही कागदपत्रे अपूर्ण दिसून आली तर त्यासंबंधीची माहिती संबंधित अर्जदाराला मेलच्या माध्यमातून कळविण्यात येते. कागदपत्रे जर बरोबर असतील तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर लागलीच करण्यात येते. एक ऑगस्टपासून राज्यांमध्ये वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे व त्यानंतर आता कर्जाचा बोजा दाखल करण्यात किंवा कमी करणे  व इतर महत्त्वाचे सेवा देखील उपलब्ध करून देण्याचे एकंदरीत नियोजन करण्यात आले आहे.

English Summary: Now the need to go to Talathi is over! Now these 8 tasks can be done at home
Published on: 06 August 2023, 07:24 IST