भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे देशातील सर्वाधिक लोकसंख्या शेती व्यवसाय करून आपले जीवन जगत आहेत. शेतकरी वर्गासमोर अनेक वेगवेगळी संकटे असतात त्यामध्ये निसर्गाचा कोप, रोगराई इत्यादी परंतु शेतकरी वर्गाला पिकाला हमीभाव सुद्धा मिळत नाही या मधील बराचसाच फायदा व्यापारी वर्ग कमवत आहे.
केंद्र सरकारच्या हमी भावानुसार राज्य सरकार कडून खरेदी केली जाते. परंतु या खरेदी आणि विक्रीच्या प्रक्रियेत व्यापारी वर्ग हात मारतात हे सर्वानाच माहीत आहे व्यापारी वर्गाकडून शेतकरी वर्गाची तसेच शासनाची सुद्धा लूट मोठ्या प्रमाणात होत असते. या व्यापारी वर्गाच्या कारभाराला आळा घालण्यासाठी आता नोंदणी करताना तसेच प्रत्यक्ष शेतमाल विक्री करताना शेतकऱ्याचे छायाचित्र काढले जाणार आहे. अशा सूचनाच आता काढण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
हेही वाचा:-आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे शरीरातील हाडे होतात कमजोर, वेळीच व्हा सावध..
हंगामाच्या वेळी शासकीय केंद्रावर हमीभावाने वेगवेगळ्या पिकांची खरेदी केली जाते यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका इत्यादी परंतु विक्री करताना शेतकरी वर्गाची नोंदणी आणि विक्री करताना फोटो काढण्याचे आदेश शासनाने दिले आहेत यामुळे व्यापारी वर्गाच्या कारभाराला यातून आळा बसणार आहे.
तसेच शेतकरी वर्गाची नोंदणी करण्यावेळी हंगामाचा अद्ययावत सातबारा, बँक पासबुक झेरॉक्स व इतर कागदपत्रे मागितली जात आहेत. सोबतच शेतकरी वर्गाचे मालाबरोबर छायाचित्रही काढणे गरजेचे केले आहे. जो शेतकरी हमीभाव केंद्रावर आपला शेतमाल विक्रीसाठी नोंदणी करेल, त्याचे छायाचित्र काढण्यात येईल. असा नवीन नियम शासनाने बनवला आहे.
हेही वाचा:-कोकणातील फळराज्याला विमा योजना, जाणून घ्या सविस्तर नियम आणि अटी
शेतकऱ्यांना होणार फायदा
प्रत्येकवेळी शासकीय केंद्रावर गावखेड्यातील व्यापारी इतरांच्या नावाने सातबारा जोडून वेगवेगळा शेतमाल दुसऱ्याच्या नावाने विकत आहे हे सर्वानाच माहीत आहे . त्याविरुद्ध ओरडही व्हायची. परंतु आजवर हे गैरप्रकार रोखणे जुळले नव्हते. आता नोंदणीपासून तर विक्रीपर्यंत खबरदारी घेणे सुरु केल्याने किमान यामुळे तरी गैरप्रकार थांबतील, अशी अपेक्षा आहे. शिवाय अशा उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असा सुद्धा अंदाज बांधला जात आहे.
Published on: 12 October 2022, 11:32 IST