उत्तर प्रदेश सरकारने (UP Govt) शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळं नुकसान झालेलं पीक सरकार खरेदी करणार आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अुदानही देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फेब्रुवारीमध्ये तापमानात अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. या वाढत्या उष्णतेचा परिणाम पिकांवर झाला. मात्र त्यानंतर मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक राज्यात शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले.
यामध्ये मोहरी, गहू, हरभरा, मसूर या पिकांना मोठा फटका बसला. तसेच फळबागांचेही नुकसान झाले. मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश सरकारनं दिलासा दिला आहे. नुकसान झालेल्या पिकांची खरेदी सरकार करणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मध्य आणि उत्तर भारतात अवकाळी पावसानं (unseasonal rain) हजेरी लावली.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना अलर्ट..
तर काही ठिकाणी गारपीट झाली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. पावसामुळं गहू आणि मोहरी पिकाचे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशमधील 10 जिल्ह्यांमधील पीक नुकसानीच्या मूल्यांकनाच्या आधारे, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी 34,137 हेक्टर पीक नुकसानीचा अंदाज लावला आहे.
आधीच दर नाही, त्यात अनुदानासाठी जाचक अट, कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा पाणी..
शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पिक वाया गेली आहेत. हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची परिस्थिती आहे. आधी अतिवृष्टीने खरीप गेले आणि आता अवकाळी पावसाने रब्बीचे नुकसान केले आहे.
पुणे जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादेमध्ये वाढ, शेतकऱ्यांना दिलासा..
कर्मचारी झाले आता राज्यातील तहसीलदार संपावर
महाराष्ट्राचा पहिला नंबर! पण कशात, इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत महाग वीज महाराष्ट्रात..
Published on: 04 April 2023, 11:01 IST