आता 1 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या भूमि अभिलेख कार्यालयात रखडलेल्या शेतजमिनीच्या मोजण्या विनानिलंब 15 दिवसांच्या आत सॅटेलाईटच्या माध्यमातून होणार आहे. शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी केल्यानंतर झालेल्या खुणाखुणा काढून टाकणे, वारंवार जमिनीची मोजणी करावी लागणे यासह मोजणीशी निगडित वादाचे प्रकार आता थांबणार आहेत.
भूमिअभिलेख अर्थात मोजणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत रामबाण उपाय शोधला आहे. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. यातून जमिनीची सॅटेलाईटच्या माध्यमातून मोजणी होणार असून, यामुळे मोजणीच्या वेळेत निम्म्याने बचत होणार आहे. शेतकऱ्यांना आता अक्षांश व रेखांशासह मोजणी नकाशेही मिळणार आहेत.
मोजणीसाठी शेतकऱ्यांची होणारी त्रेधातिरपीट थांबणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जमीन मोजणीच्या कामासाठी खोळंबा होणार नसून जमीन मोजणीसाठी अर्ज दिल्यानंतर किमान 15 दिवसांत ही मोजणी केली जाणार आहे. नवीन तंञज्ञानामुळे वेळेची बचत होवून काटेकोरपणे ही मोजणी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांध कोराकोरी व वादविवादाला या मोजणीतून पुर्णविराम मिळणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
खाद्य तेलाचे दर वाढणार की कमी होणार, जाणून घ्या..
आधुनिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे या शेतजमीन मोजणी होणार असल्याची माहीती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे बोलत होते. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दुःखद! वीज कोसळून अख्ख शेतकरी कुटुंब ठार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत असून याचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
...तर तुमच्या घरी धुणीभांडी करतो, भाजप नेत्याचे राहुल कुल यांना आव्हान
मोदींचा 2 हजाराचा 14 वा हप्ता मे महिन्यात होणार जमा, शेतकऱ्यांनो केवायसी करा...
आता शेतीला दिवसा वीज! मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे लोकार्पण..
Published on: 27 April 2023, 11:07 IST