News

काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींवर हस्तांतरणाचे निर्बंध असल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

Updated on 05 August, 2023 11:48 AM IST

काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींवर हस्तांतरणाचे निर्बंध असल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

७/१२ उताऱ्यावर 'पुनर्वसनासाठी राखीव' असे शिक्के असल्याने शेतकऱ्यांना या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येत नव्हते, तसेच कर्जही काढता येत नव्हते. असे असताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हस्तांतरणाचे नियम १८ जानेवारी २०२२ मध्ये शिथिल करण्यात आले.

ती अट शिथिल झाल्यामुळे राज्यात अशा जमिनीचे व्यवहार करता येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र भूधारकांच्या जमिनीच्या हस्तांतरणावर निर्बंध घालण्यासाठी ७/१२च्या उताऱ्यावर इतर हक्कांमध्ये 'पुनर्वसनासाठी राखीव' असे मारलेले शेरे कमी केले जाणार आहेत.

माळवी गाय तुम्हाला श्रीमंत करेल, सर्वात जास्त दूध देणाऱ्या जातींपैकी एक

तसेच खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरील निर्बंध उठवले आहेत. असे असताना मात्र अजूनही काही धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर हे शेरे आणि निर्बंध कायम आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न, नियुक्त्या जाहीर...

ते निर्बंध लवकरात लवकर उठवले जातील, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिले. याबाबत शेतकरी अनेकदा मागणी करत होते. 

माळवी गाय तुम्हाला श्रीमंत करेल, सर्वात जास्त दूध देणाऱ्या जातींपैकी एक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न, नियुक्त्या जाहीर...
मोठी बातमी! अखेर विहिरीची रिंग कोसळून विहिरीत पडलेल्या 4 मजुरापैकी एका मजुराचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला...

English Summary: Now 'that' land will also be dealt with! Vikhe Patal's big announcement regarding rehabilitation land...
Published on: 05 August 2023, 11:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)