News

सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरू झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना जात वैधता प्रमाणपत्राची किंवा जात वैधता प्रमाणपत्रासाठी चे प्रकरण दाखल केल्याची पावती लागत असल्याने विद्यार्थ्यांचे गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या अर्जाच्यसुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

Updated on 22 November, 2021 5:28 PM IST

सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरू झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना जात वैधता प्रमाणपत्राची किंवा जात वैधता प्रमाणपत्रासाठी चे प्रकरण दाखल केल्याची पावती लागत असल्याने विद्यार्थ्यांचे गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या अर्जाच्यसुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

16 नोव्हेंबर पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा प्रक्रियेचा वेग मंदावलेला आहे.त्यामुळे विविध जिल्ह्यांमधून अर्जदार लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडून ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबाबत बार्टीकडे विनंती केलेली होती. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी पुणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणांसाठी करता येणार

 संबंधित अर्ज हे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने दिनांक 17 ते 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत स्वीकारण्यात येतील. ऑफलाइन  अर्ज करण्याची सुविधा फक्त शैक्षणिक कारणाकरता उपलब्ध करण्यात आली आहे. तशा आशयाची सूचना सर्व जातपडताळणी समिती यांनाही बार्टी मार्फत पत्रकान्वये देण्यात आली आहे. अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था( बार्टी) पुणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

तसेच बार्टी मार्फत राज्यातील असलेल्या 30 केंद्रांवर रेल्वे, एल आय सी, पोलीस भरती, बँकिंग इत्यादी क्षेत्रातील नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या एप्टीट्यूड टेस्ट, लेखी परीक्षा इत्यादींच्या तयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी 9 डिसेंबर 2021 पूर्वी संबंधित केंद्रावर अर्ज सादर करण्यात यावेत, असे आव्हानही बार्टी  मार्फत करण्यात आले आहे.(स्त्रोत-Tv9 मराठी)

English Summary: now student do application for cast validity certificate by online and offline ways
Published on: 22 November 2021, 05:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)