1. बातम्या

माती परीक्षण करायचे आहे? तर आता होईल अवघ्या 90 सेकंदात

भरघोस उत्पादनासाठी मातीची उत्पादकता मातीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. उत्पादनवाढीसाठी शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा उपयोग करीत असतात. त्या माध्यमातून पिकांना लागणारी आवश्यक घटकांची पूर्तता केली जाते. मातीत मध्ये असलेली कोणते पोषणमूल्य किती प्रमाणात आहेत हे आपल्याला माती परीक्षणावरून कळते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
soil testing

soil testing

भरघोस उत्पादनासाठी मातीची उत्पादकता मातीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. उत्पादनवाढीसाठी शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा उपयोग करीत असतात. त्या माध्यमातून पिकांना लागणारी आवश्यक घटकांची पूर्तता केली जाते. मातीत मध्ये असलेली कोणते पोषणमूल्य किती प्रमाणात आहेत हे आपल्याला माती परीक्षणावरून कळते.

या महत्त्वाच्या माती परीक्षणामध्ये तंत्रज्ञानामुळे एक महत्त्वाचे पाऊल पडले असून आता माती परीक्षणासाठी वाट पाहण्याची गरज नाही. कारण आता यासाठी आयआयटी कानपूर एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांनी एक पोर्टेबल माती परीक्षण उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण एम्बेडेड मोबाईल एप्लीकेशन द्वारे अवघ्या 90 सेकंदात मातीच्या आरोग्याची माहिती देते.विशेष म्हणजे नमुना म्हणून फक्त पाच ग्रॅममाती यामध्ये वापरावी लागते.

या यंत्राद्वारे कसे होते माती परीक्षण?

या पोर्टेबल यंत्राच्या साह्याने भूपरीक्षकामध्ये नमुना म्हणून फक्त पाच ग्रॅम वाळलेल्या मातीची गरज असते. पाच सेंटीमीटर लांबीच्या दंडगोलाकार उपकरणांमध्ये माती घातल्यानंतर हे उपक्रम स्वतः ब्ल्यूटूथ द्वारे मोबाईल ला जोडते आणि अवघ्या पाच सेकंदात मातीचे विश्लेषण करायला सुरुवात करते.विश्लेषणानंतर माती परीक्षण चाचणी चे परिणाम जमिनीच्या आरोग्य अहवालाच्या स्वरूपात स्क्रीन वर दाखवते.

भू परिरक्षक नावाचे हेअँपगुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.असे आयआयटी काढून पूर्ण जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. अशा प्रकारचा हा पहिला शोध असून इन्फ्रारेड असतो स्पेक्ट्रोस्कॉपी तंत्रज्ञानावर आधारित आहे. ज्याच्या सायने स्मार्टफोनवर माती परीक्षणाचा अहवाल समजतो. या उपकरणाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे म्हणून याचे तंत्रज्ञान ऍग्रोनेक्स्टकंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले असून यासंदर्भात 11 डिसेंबर 2021 रोजी आयआयटी कानपूर आणि ऍग्रोनेक्स्ट सर्विसेस यांच्यात तंत्रज्ञान परवाना करार झाला आहे.

English Summary: now soil testing get in only 90 second iit kaanpur develope bhuparirakshak app Published on: 17 January 2022, 10:44 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters