News

शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहेत. अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे तो पूर्णपणे कोलमडला आहे. असे असताना शेतकऱ्यांसाठी आता माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुली व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांची नावे कमी करुन लिलाव करण्याचे कारवाई विरोधात आता ते आक्रमक झाले आहेत.

Updated on 31 December, 2022 10:34 AM IST

शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहेत. अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे तो पूर्णपणे कोलमडला आहे. असे असताना शेतकऱ्यांसाठी आता माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुली व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांची नावे कमी करुन लिलाव करण्याचे कारवाई विरोधात आता ते आक्रमक झाले आहेत.

सर्व शेतकरी संघटना, राजकीय पक्ष एकवटले असून पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारी रोजी शेतकरी संघटना व थकबाकीदार शेतकरी व त्यांचे कुटुंब बिऱ्हाड आंदोलन करणार आहे. यास राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवित स्वत: या आंदोलनात सहभागी होणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला हात आहे.

याबाबत माहिती अशी की, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतुन सहकारी सोसायटी मार्फत जवळपास ६२ हजार शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे. जिल्हा बँक कर्ज वसुली करताना अतिशय चुकीच्या मार्फत कर्ज वसुली करीत आहे. असा आरोप शेतकरी करत आहेत. बळीराजा मागील गेल्या सात ते आठ वर्षापासून गारपिठ, पिकाला भाव नाही अशा अनेक संकटाना तोंड देत आहेत.

'मुकादम एका कारखान्याची ॲडव्हान्स बुडवून दुसऱ्या कारखान्याकडे जातो, तिथे अर्धे काम करून तिसऱ्याकडे जातो'

शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण, मुला-बाळाचे लग्न, तसेच प्रपंच या सर्व गोष्टी बघत असतांना जिल्हा बँकेची परतफेड झालेली नाही. या कारणाने जिल्हा बँक अतिशय चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची जुलमी वसुली करीत आहे. यामुळे आता शेतकरी मैदानात उतरले आहेत.

महावितरणची नवीन शाळा! ट्रान्सफॉर्मर बदलायचाय मग वीज बिल भरा..

दरम्यान, मालेगाव येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी जिल्हा बँकेचे थकबाकीदार आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार, उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले असल्याची तक्रार
29 गुंठ्यांत 3 लाखांचा नफा! काकडीची शेती ठरली फायद्याची
'आता प्राण्यांच्या हल्ल्यात शेतीचे नुकसान झाल्यास भरपाईची रक्कम दुप्पट करणार'

English Summary: Now Raju Shetty hold protest front home Guardian Minister.
Published on: 31 December 2022, 10:34 IST