News

बाप रे! चालू असलेल्या खरीप हंगामात राजमा हे पीक फक्त ६० ते ७० दिवसांमध्ये घेता येत आहे हे एक अशक्य आहे जे की बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन या संस्थेने हे शक्य करून दाखवले आहे.

Updated on 03 January, 2022 11:36 PM IST

बाप रे! चालू असलेल्या खरीप हंगामात राजमा हे पीक फक्त ६० ते ७० दिवसांमध्ये घेता येत आहे हे एक अशक्य आहे जे की बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन या संस्थेने हे शक्य करून दाखवले आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आधी हवामानाचा अभ्यास करून रब्बी हंगामात हरभरा तसेच राजमा चे पीक घेतात. परंतु मार्केटमध्ये मागणीपेक्षा जास्त उत्पादन आलं तर शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाच्या तुलनेत पुरेसे पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या या समस्येवर बारामती मधील माळेगाव खुर्द येथील अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने मार्ग काढला आहे जे की खरीप हंगामात हे पीक घेऊन अधिकचा स्वरूपात उत्पादन काढून शेतकऱ्यांना दाखवले आहे.

अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये जे उत्पादन काढून दाखवले आहे जे की यामध्ये संस्थेचे संचालक डॉ. वहमांशु पाठक, जल ताण व्यवस्थापक प्रबंधक डॉ. जगदीश राणे तसेच वॉटर ट्रेस मॅनेजमेंट शास्त्रज्ञ डॉ. एस. गुरुमूर्ती यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रतिभा उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अशोकराव तावरे यांज सुद्धा या प्रयोगाला मदत केली आहे. अशोकराव तावरे हे तेथील स्थानिक शेतकरी आहेत.

माळेगाव खुर्द च्या अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या प्रायोगिक क्षेत्रावर १० जून ला राजमा आणि हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. यामध्ये हरभरा पिकाच्या ७४ वाणांची लागवड केली होती. या वाणाची लागवड सरी वरंभ्यालगत केली गेली होती जे की खत व पाणी योग्य पद्धतीने दिल्याने खरीप हंगामात हे पीक यशस्वीपणे आले आहे. राजमा पिकांकडे जरी पाहिले तरी चांगल्या प्रकारची परिस्थिती दिसून येते. सध्याच्या स्थितीला या पिकांची काढणी सुरू आहे.

माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेत ठरला यशस्वी प्रयोग

खरीप हंगामात हरभरा पीक घेण्याचे फायदे :-

१. खरीप हंगामात आपण ऊसाबरोबर आंतरपीक म्हणून हरभराचे पीक घेऊ शकतो.
२. जमिनीची पोत सुधारण्यासाठी फायदेशीर.
३. खरीप हंगामात हरभऱ्याचे फक्त ६०-६५ दिवसांमध्ये उत्पन्न घेता येते.
४. ऑफ सीझनमध्ये हरभरा ला चांगला दर मिळतो.
५. रब्बी हंगामात बियाणे म्हणून याचा उपयोग.

पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सर्वसाधारण ३० अंश डिग्री सेल्सियस तापमान असते तर १५० - २०० मी.मी पाऊस झाला असतो. जे की अशा स्थितीमध्ये निचऱ्याची जमीन घेऊन हरभरा तसेच राजमा पिकाची लागवड करून यशस्वीपणे उत्पन्न घेतले आहे. अजूनही या पिकांवर प्रयोग करायचे बाकी असल्याने वर्षाच्या अखेरीस हे पूर्ण होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना शेतात हा प्रयोग करण्याची परवानगी दिली जाईल.

English Summary: Now Rajma and gram production can be taken even in kharif season
Published on: 03 January 2022, 11:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)