गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेसाठी आवश्यक ई-केवायसी संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधापासून ते दिल्लीपर्यंत चर्चा बघायला मिळत आहे. या योजनेअंतर्गत आता पात्र शेतकऱ्यांना अकरावा हप्ता (11Th Installment of PM kisan Yojna) देण्यात येणार आहे मात्र हा अकरावा हप्ता प्राप्त करण्यासाठी पात्र शेतकर्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.अर्थात ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत दहाव्या हफ्त्याचा लाभ घेतला आहे त्यांना पुढचा हप्ता प्राप्त करण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे.
महत्वाची बातमी:-कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्राकडे धाव; खतांच्या किमती वाढतील म्हणून चिंतेत म्हणुन सांगितला 'हा' तोडगा
या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे त्यामुळे प्रत्येकाला केवायसी संदर्भात माहिती झाली आहे मात्र असे असले तरी पीएम किसानच्या (Pm Kisan Yojna) अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेबसाईटनुसार, लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी आधार कार्ड तसेच आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर गरजेचा राहणार आहे. आता या दोन कागदपत्रांवर ई-केवायसी केली जाणार आहे.
खरं पाहता ई-केवायसी (E-KYC) साठी शासनाने दहावा हफ्ता येण्याअगोदरच लाभार्थ्यांना सूचना केल्या होत्या मात्र तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यावेळी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे जमले नाही म्हणून शासनाने यासाठी मुदतवाढ दिली आणि आता 31 मार्च 2022 ही शेवटची तारीख शासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा:-महत्वाचे! खरीप हंगामात खतांचा तुडवडा भासणार, म्हणुन आताच करा 'हा' उपाय; नाहीतर………!
शेतकऱ्यांना ई-केवायसी कंप्लिट करण्यासाठी आधार कार्ड तसेच आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर असणे अनिवार्य राहणार आहे. परंतु जर शेतकरी बांधवांकडे आधारकार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर नसेल तर जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन आधार कार्डवर मोबाईल नंबर अपडेट करणे अनिवार्य राहणार आहे.
महत्वाची बातमी:-मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी एक अनोखे गिफ्ट; मिळणार पाच लाखांचे अनुदान
कशी करणार ई-केवायसी
पीएम किसानच्या ज्या लाभार्थ्यांनी अद्याप पी एम किसान या योजनेसाठी केवायसी केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in/ या पीएम किसानच्या अधिकृत साइटवर भेट द्यावी लागेल.
संबंधित बातम्या:-ऐकलं व्हयं! आता पीएम किसान योजनेची ई-केवायसी मोबाईलवरच करता येणार; जाणून घ्या प्रोसेस
या वेबसाईटवर गेल्यानंतर मुख्य पेज वर उजव्या कोपर्याला केवायसी चा ऑप्शन दिसेल यावर गेल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी गेल्यावर आपणास बारा अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल आधार क्रमांक टाकल्यानंतर सर्च या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर आपणास आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक (जो आधार कार्डशी लिंक असेल तो) प्रविष्ट करावा लागणार आहे. मोबाईल क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर आपणास दोन ओटीपी येतील. ओटीपी टाकल्यानंतर आपणास सबमिट फोर ऑथेंटिकेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल. जर आपल्या डिटेल्स योग्य असतील तर ई-केवायसी सक्सेसफुल होईल अन्यथा वरती अमान्य(Invalid) म्हणून लिहिलेले दिसेल.
हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेचा अकरावा हफ्ता एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळेच ज्या लाभार्थ्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर केवायसी करणे अनिवार्य राहणार आहे.
महत्वाची बातमी:-साहेब! वीजपुरवठा सुरळीत सुरु झाला खरं; मात्र, रब्बी पिके घेतील का पुन्हा उभारी?
Published on: 18 March 2022, 01:04 IST