News

पंढरपूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरदेखील बंद आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

Updated on 19 June, 2020 8:21 AM IST


पंढरपूर:
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरदेखील बंद आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी बंद असून या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. मंदिर बंद असल्याने भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची आता ऑनलाईन थेट सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन

  • संकेतस्थळ: http://www.vitthalrukminimandir.org
  • गुगल प्ले स्टोअरवरील ॲप: shreevitthalrukmnilive Darshan
  • जिओ टीव्ही: जिओ दर्शन
  • टाटा स्काय: ॲक्टिव्ह चॅनेल

वरील विविध माध्यमांतून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार भाविकांना पाहता येणार आहे.

१ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा कोरानाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही भाविकांना दर्शनासाठी सोडता येणार नाही. भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर्शनास पंढरपूरात येणे टाळावे. भाविकांनी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात आलेल्या या ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी केले आहे.

English Summary: Now online darshan of Shree Vitthal-Rukmini of Pandharpur
Published on: 19 June 2020, 08:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)