News

सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी रविकांत तुपकर हे मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सरकारने तुपकरांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही. या पार्श्वभुमीवर १५ डिसेंबर २०२३ रोजी सोमठाणा येथे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्वाची बैठक रविकांत तुपकर शेतकऱ्यांसोबत करणार आहे.

Updated on 14 December, 2023 5:25 PM IST

सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी रविकांत तुपकर हे मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सरकारने तुपकरांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही. या पार्श्वभुमीवर १५ डिसेंबर २०२३ रोजी सोमठाणा येथे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्वाची बैठक रविकांत तुपकर शेतकऱ्यांसोबत करणार आहे.

रविकांत तुपकर यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तुपकर म्हणतात की, येलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी १००% नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या २ महिन्यांपासून रस्त्यावर आहोत.एल्गार रथयात्रा, एल्गार महामोर्चा, सोमठाणा येथील अन्नत्याग आंदोलन व मुंबईत मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी दिलेली धडक यामुळे राज्य सरकारने आपल्याशी चर्चा केली.

या चर्चेत बहुतांश मागण्या त्यांनी मान्य केल्या. मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण शेतकन्यांनी सरकारला १५ डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती. पण सरकारने अद्याप आपल्या मागण्यांसंदर्भात अंमलबजावणीला सुरवात केली नसल्याने, आपल्याला पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाचे हत्यार उपसणे गरजेचे आहे. त्यामुळे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित केली आहे. तरी दि.१५ डिसेंबर २०२३ संध्याकाळी.६.०० वाजता सोमठाणा येथे सर्व शेतकरी, शेतमजूर व शेतकरीपूत्रांनी या महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती तुपकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे.

English Summary: Now once again we need to raise the weapon of aggressive agitation - Ravikant Tupkar
Published on: 14 December 2023, 05:25 IST