News

पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये हे तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात.

Updated on 23 December, 2021 11:42 AM IST

पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये हे तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात.

आता या योजनेच्या माध्यमातून दहावा हपत्याची वाट शेतकरी पाहत आहेत. यावेळेस या योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने बरेच बदल केले आहेत. जसे की आता एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ईकेवायसी सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु आता सरकारने यामध्ये एक बदल केला असून या योजनेचा लाभ आता सरकारी नोकरी करणाऱ्या उमेदवाराला देखील मिळणार आहे.

पीएम किसान सम्मान निधि नुसार एफ अँड क्यू अनुसार सरकारी संस्थेमध्ये काम करणारे मल्टिटास्किंग स्टाफ, ग्रुप डी आणि चतुर्थ श्रेणी मध्ये काम करणारे आणि सेवानिवृत्त कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. जर त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती याचा लाभ घेत नसेल तरचते या  योजनेचा लाभ घेऊ शकतील.

 या चुकांमुळे अडकू शकतो हप्ता

 एखादा शेतकरी त्याच्या शेतजमिनीचा वापर शेतीसाठी न करता इतर वेगळ्या कामासाठी करत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

तसे जाता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या दहाव्या हप्त्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी असून त्यांच्या कुटुंबातील फक्त एका सदस्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.पती-पत्नी फक्त एकालाच या योजनेसाठीनोंदणी करू शकतात. तसेच चुकीची माहिती देऊन एखाद्या व्यक्तीने जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा अर्थच रद्द होणार नाहीतर त्याला मिळालेली रक्कम देखील वसूल केली जाईल.(संदर्भ-TimesnowNewsमराठी)

English Summary: now new desicion of central goverment to get benifit to grade 4 staff and multitasking staff of pm kisaan
Published on: 23 December 2021, 11:42 IST