1. बातम्या

विशेष: आता बाळाच्या जन्मा सोबतच मिळेल आधार नंबर, हॉस्पिटलमध्ये सुरू होणार लवकर नाव नोंदणी

नवजात बालकांना रुग्णालयांमध्ये चा आधार कार्ड जारी व्हावे याची तयारी आधार कार्ड बनवणारी अथॉरिटी युआयडीएआय करीत आहे. यासंदर्भात लवकरच हॉस्पिटलमध्ये नाव नोंदणी सुरू करण्यात येणारआहे. जर वाड्याच्या योजनेनुसार जर सर्व काही झाले तर बाळाचा जन्म प्रमाणपत्र येण्यापूर्वी त्याच्याकडे आधार कार्ड असेल.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
adhaar card

adhaar card

नवजात बालकांना रुग्णालयांमध्ये चा आधार कार्ड जारी व्हावे याची तयारी आधार कार्ड बनवणारी अथॉरिटी युआयडीएआय करीत आहे. यासंदर्भात लवकरच हॉस्पिटलमध्ये नाव नोंदणी सुरू करण्यात येणारआहे. जर वाड्याच्या योजनेनुसार जर सर्व काही झाले तर बाळाचा जन्म प्रमाणपत्र येण्यापूर्वी त्याच्याकडे आधार कार्ड असेल.

याविषयी एएनआयया वृत्तसंस्थेशी बोलताना युआयडीएआय चे सीईओ सौरभ गर्ग म्हणाले की, आम्ही नवजात बालकांना आधार क्रमांक देण्यासाठी बर्थ रजिस्टर करार करण्याचा प्रयत्न करत आहोत. गर्ग यांनी सांगितले की,99.7% प्रौढ लोकसंख्येला आधारचा समावेश करण्यात आला आहे. आता नवजात बालकांची नोंदणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, दरवर्षी दोन ते अडीच कोटी मुले जन्माला येतात. आम्ही त्यांच्या आधार नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत आहोत.

बाळाच्या जन्माच्या वेळी त्याच्या/ तिच्या फोटो वर क्लिक करून आधार कार्ड दिले जाईल.  गर्ग  पुढे म्हणाले की, आम्ही पाच वर्षाखालील मुलांचे बायोमेट्रिक्स घेत नाही, तर ते त्यांच्या पालकांपैकी एकाशी जोडतो वयाची 5 वर्ष ओलांडल्यानंतर मुलाचे बायोमेट्रिक घेतले जातील. आम्ही आमच्या संपूर्ण लोकसंख्येला आधार क्रमांक देण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्यावर्षी दुर्गम भागात दहा हजार शिबिरे उभारण्यात आली तेथे अनेक लोकांकडे आधार क्रमांक नसल्याचे सांगण्यात आले.

या सराव शिबिरात तीस लाख लोकांनी सहभाग घेतला होता. आम्ही 2010मध्ये पहिला आधार क्रमांक जारी केला होता. तेव्हा आमचे लक्ष होते की जास्तीत जास्त लोकांचे  नोंदणी करावी. याबाबतीत आता आमचे लक्ष ते अपडेटकरण्यावर आहे. दरवर्षी सुमारे दहा कोटी लोक त्यांचे नाव पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करतात. 140 कोटी बँक खात्यांपैकी 120 कोटी खाते आधारशी  जोडण्यात आली आहेत.

 ( संदर्भ – दिव्य मराठी )

English Summary: now new born baby get adhaar card before birth certificate in hospital uidai says Published on: 17 December 2021, 11:09 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters