आपण बगतो की अनेकदा शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करतात, याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणाऱ्या भावाला असलेली अनियमितता. अनेकदा आपण बघतो नैसर्गिक संकटे आणि बाजारभावात चढउतार होत असल्याने शेतकरी तोट्यात जातो, आणि यामुळे त्याला अनेकदा कर्ज फेडणे शक्य होत नाही. यामुळे त्यांना पुन्हा कर्ज मिळण्यास अनेक अडचणी येतात. असे असताना आता आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत की त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालावर तारण कर्ज मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालावर कर्ज ही शेतीमाल तारण योजना जुनीच आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी यावर्षी झाली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना गरजेच्यावेळी कर्ज मिळत आहे. यामुळे योजनेचा उद्देशही साध्य झाला आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण योजनेमध्ये शेतीमालाच्या काढणी हंगाम ऑक्टोबर 2021 पासून आतापर्यंत 70 बाजार समित्यांनी सहभाग घेत 37 कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. यामुळे अनेकजण याचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे.
खरीप हंगामाच्या वेळी शेतीमाल तारण योजनेअंतर्गत दीड लाख क्विंटल शेतीमाल तारण ठेवण्यात आला होता. आता तारण केलेला माल शेतकऱ्यांनी विक्री केला आहे. यामुळे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती लाभ झाला याचा लेखाजोखा पणन मंडळाच्यावतीने सादर करण्यात आला. यामुळे ही योजना फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्या संबंधित बाजार समित्याच शेतकऱ्यांना पैसे देत होत्या. तसेच ज्या बाजार समित्या स्वनिधीतून तारण कर्ज योजना राबवितात त्यांना त्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रक्कमेवर 5 टक्के व्याज सवलत अनुदान स्वरूपात देण्यात येते.
तसेच यामध्ये सगळ्याच बाजार समितीची क्षमता सारखी नसते, यामुळे एखादी बाजार समिती निधीअभावी ही योजना राबवत नसेल तर पणन मंडळाकडून अशा बाजार समित्यांना 5 लाख रुपये दिले जात असल्याचे पणन मंडळाने सांगितले आहे. यामध्ये बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतीमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंतची रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याजदराने तारण कर्ज स्वरूपात बाजार समितीमार्फत त्वरित दिली जाते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना गरजेच्यावेळी मदत मिळाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन तारण ठेऊन 75 टक्के रक्कम वापरली देखील आहे. यामुळे यामधून मोठी उलाढाल होत आहे.
Published on: 07 February 2022, 10:35 IST