शेतीसाठी पाणी खूप महत्त्वपूर्ण असून पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही. शेती आणि पाणी ह्या एकमेकांशी निगडित बाबी असून पाणी हे शेतीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. परंतु पिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होण्यासाठी विजेची तेवढीच आवश्यकता असते. परंतु बऱ्याचदा वीज वारंवार खंडित होणे किंवा विजेचा लपंडाव किंवा वीज बिल थकीत असल्यामुळे वीस पुरवठा कट करणे यासारखे प्रकार घडतात व शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते.
नक्की वाचा:तुती लागवडीतून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; रोपवाटीकेचे करा असे नियोजन
परंतु या अनुषंगाने एक शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची अपडेट समोर आलेले असून त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर पीक उभे असेल तर विजेच्या थकबाकी पोटी विज कनेक्शन तोडता येणार नाही, अशा सूचना राज्य अन्न आयोगाने दिले आहेत.
शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी अखंडित वीजपुरवठा करण्याच्या सूचना देखील आयोगाने वीज वितरणला केले आहेत. यासंबंधीचे अधिक माहिती अशी की लोक संघर्ष मोर्चाचे सचिन प्रल्हाद धांडे आणि भारतीय किसान संघाचे बळीराम सोळंके,
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल नामदेव पवार राजे इत्यादी विरुद्ध राज्य विद्युत नियमक आयोग व राज्य अन्न आयोगासमोर 13 आणि 21 ऑक्टोबर अशी दोन वेळा सुनावणी झाली. यासंबंधीची माहिती याचिकाकर्त्याचे वकील ॲड. अजय तल्हार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
नक्की वाचा:आनंदाची बातमी! सौर पंप खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान
शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी अखंडित विजपुरवठा व्हावा यासाठीच्या उपाययोजना करण्यात याव्या, या सूचना देखील आयोगाने राज्य सरकारला केले आहेत.
वीज पुरवठा कट करणे ऐवजी दुसरा पर्यायाचा अवलंब करावा
अन्नसुरक्षा अधिनियम 2013 नुसार विचार केला तर शेतीसाठी सुविधा व उत्पादकता वाढवण्याची जबाबदारी ही राज्य व केंद्र शासनाची असून पिक काढण्याच्या वेळेस असताना वीजपुरवठा खंडित करणे ऐवजी
वीज कंपनीकडे दुसरा पर्याय आहे का अशी विचारणा देखील आयोगाने केली. यावर आता कंपनीच्या वकिलांनी उत्तर दिलेली नसून त्याऐवजी दुसरा पर्याय शोधावा, असे देखील आयोगाने सुचित केले आहे.
Published on: 29 October 2022, 04:47 IST