जमिनीची मोजणी करणे म्हणजे लाखो रुपयांचाखर्च येतो.इतकेच नाही तरखूप वेळ सुद्धा यामध्ये खर्च होतो.ही सगळी झंजट कमी व्हावी यासाठी भूमिअभिलेख विभागाने अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा निर्मिती करूनत्याचा वापर सुरू करणार आहेत. या लेखात आपण या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेऊ.
काय आहे हे तंत्रज्ञान?
राज्याच्या भूमिअभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडिया च्या मदतीने राज्यात 77 ठिकाणी कंटिन्यूअस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन म्हणजे कॉर्स उभारले आहेत. याच्या तांत्रिक तपासण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर या कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडिंग फक्त तीस सेकंदात घेता येणार असून या सोयीमुळे जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.
आता मोजणी वरील ईटीएस मशीनच्या साहाय्याने
सध्या जमीन मोजणी साठी ईटीएस साह्याने मोजणी करणे हा पण एक पर्याय उपलब्ध आहे.
संबंधित मोजणीच्या जागेवर जीपीएस रिडींग घेऊन त्या क्षेत्राच्या अक्षांश आणि रेखांश घेतले जातात.या अक्षांश व रेखांश याच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरेल. सध्या असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात.
आता होईल सर्वे ऑफ इंडिया च्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
जीपीएस रीडिंग घेण्यासाठी जो वेळ लागत होता तो कमी करण्यासाठी शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडिया च्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा मदतीने हा वेळ कमी करण्यात येणार आहे.
त्यासाठी पूर्ण राज्यात कॉर्स स्टेशनचे जाळे उभारण्यात येणार आहे. सध्या सर्वे ऑफ इंडिया कडून या स्टेशनची जीपीएस रीडिंगची अचूकता तपासणीचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कॉर्स तंत्रज्ञानाद्वारे जमीन मोजणी सुरुवात होणार आहे. ( स्त्रोत-मीE शेतकरी)
Published on: 07 October 2021, 07:54 IST