कापूस हे खरीप हंगामातील महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे पीक असून शेतकऱ्यांचा प्रमुख आधार असलेले पीक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्र मध्ये कापसाचे उत्पादन हे विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश भागांमध्ये जास्त प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्राच्या कापसाला भरपूर अशी मागणी असते.
जर गुजरात येथील जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीचा जरी विचार केला तर त्या ठिकाणी देखील महाराष्ट्राच्या कापसाला आणि विशेष करून मराठवाड्याच्या कापसाला खूप अशी मागणी असते आणि एकंदरीत भारताची स्थिती बघितली
तर जागतिक स्तरावर कापूस लागवडीच्या बाबतीत अव्वल स्थान भारताचे आहे. परंतु असे असून देखील भारत उत्पादनाच्या बाबतीत खूपच मागे असून शेतकऱ्यांना कापूस उत्पादनामध्ये वाढ कशी करावी यासाठी प्रोत्साहन देण्याच्या तयारीत आहे.
नक्की वाचा:Cotton Varieties: देशी कापसाचे नवीन वाण 160 दिवसात तयार; जाणून घ्या 'या' वाणाविषयी
यासाठी कापसाचा नवा ब्रँड बाजारात
शेतकऱ्यांनी कापूस लागवड केल्यानंतर कापसाचे उत्पादन त्या प्रमाणात वाढण्यासाठी बियाणे हा घटक खूप महत्वपूर्ण भूमिका निभावतो. त्यासोबतच आवश्यक गोष्टींमध्ये ब्रँड असणे देखील महत्वाचे असते.
कारण आपल्याला माहिती आहे की कुठलीही उत्पादन किंवा वस्तू तुम्हाला बाजारपेठेत विकायचे असेल तर एखाद्या ब्रँडच्या छताखाली तिचे मार्केटिंग करणे सोपे व शक्य होते. त्यामुळे आता भारतीय कापसाला जागतिक स्तरावर मान मिळावा यासाठी कस्तुरी ब्रँडने भारतीय कापसाचे मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी विविध तीन समित्यांची स्थापना देखील करण्यात आली आहे.
त्यामुळे आता या ब्रँडच्या छताखाली कापसाची मार्केटिंग जर केली तर जागतिक स्तरावर भारतीय कापसाची एक वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होईल तसेच याच ब्रँडच्या छताखाली भारतीय कापसाचे जागतिक स्तरावर प्रमोशन करता येणे सोपे होणार आहे.
या सगळ्या गोष्टींसाठी तीन समित्यांची स्थापना करण्यात आली असून कापसाचा दर्जा चांगला राहावा यासाठी व्हॅल्यू प्रेपोझिशन समिती काम करेल. तसेच दुसरी समिती ही कापसाचे प्रमाणीकरण यावर काम करेल. अशाप्रकारे तीनही समित्यांमध्ये कामाची विभागणी करून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना काय होईल फायदा?
जर आपण भारतीय कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या एकंदरीत एकरी उत्पादनाचा विचार केला तर तो केवळ चार क्विंटल इतकी आहे. यासाठी अतिसघन या लागवड पद्धतीने कापूस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे बाबत निर्णय घेण्यात आला आहे.
कापसाचा ब्रँड असल्यामुळे जगभरात भारतीय कापसाला एक विशेष स्थान आणि ओळख मिळणार असून त्यामुळे बँड आणि दर्जा पाहूनच कापसाचा दर ठरणार आहे आणि यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होणार ती म्हणजे आता इतर देशासारखाच भारत देखील कापसाचा दर निर्धारित करू शकणार आहे याचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होईल.
Published on: 01 August 2022, 07:59 IST