News

परिणामकारकपणे नियोजन हे कुठल्याही क्षेत्रातील यशाचे गमक आहे. जर नियोजन शून्य काम करीत गेले तर काम बिघडते किंवा केलेली योजना फोल ठरते. त्यामुळे नियोजन अचूक पणे आणि अचूक वेळी करणे फार महत्त्वाचे असते.

Updated on 18 April, 2022 1:44 PM IST

परिणामकारकपणे नियोजन हे कुठल्याही क्षेत्रातील यशाचे गमक आहे. जर नियोजन शून्य काम करीत गेले तर काम बिघडते किंवा केलेली योजना फोल ठरते. त्यामुळे नियोजन अचूक पणे आणि अचूक वेळी करणे फार महत्त्वाचे असते.

कारण नियोजनाने कुठली कामात अधिक परिणामकारकपणे करता येते व ऐनवेळी धावपळ होत नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीत म्हणजे नियोजन फार महत्त्वाचे असते. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचा कृषी विभाग येणाऱ्या  खरीप हंगामाच्या नियोजन करण्यासाठी कामाला लागला आहे. वेळेला घाईगडबड करण्यापेक्षा खरीप हंगामाला अजून वेळ असताना लवकर याबाबतीत कृषी विभाग कार्य मित्र झाला असून शेतीचे उत्पादन आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जाणार आहेत.

नक्की वाचा:40 किलो टोमॅटो घ्या तरच मिळेल 10 किलो मिरची, या शेतीमाल खरेदी विक्री संघाचा निर्णय

दरवर्षीप्रमाणे कागदोपत्री हे नियोजन न होता आता थेट शेतकऱ्यांशी बोलून या सगळ्या गोष्टी ठरवला जाणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना पंचवीस महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. या गोष्टींच्या परिणामकारकपणे वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. ही सगळी प्रक्रिया आता गाव स्तरावरून सुरू करण्यात आली आहे.

 या पंचवीस बाबी ठरतील टर्निंग पॉईंट

 यामध्ये शेतकऱ्यांसाठी 25 महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आले असून या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या पंचवीस बाबींमध्ये उत्पादकता आणि हंगामाचे उद्दिष्ट, गावातील चालू पीक शेत्र, उत्पादन, प्रमुख पिकांच्या वाणांचे बीजोत्पादन, बियाण्याची उगवणक्षमता तपासणी, रासायनिक खतांची बचत, निविष्ठांची मागणी व पुरवठ्याचे नियोजन, जमीन सुपीकतेचे निर्देशांक, पौष्टिक तृणधान्य याचा प्रचार, रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी, आंतरपीक व तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी विशेष मोहीम, कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कृषी संजीवनी मोहिमेचे नियोजन, उपलब्ध पाण्यामध्ये पिकांचे नियोजन, विकेल ते पिकेल अभियानाची अंमलबजावणी आणि प्रक्रिया उद्योगांची उभारणी इत्यादी 25 गोष्टींवर भर देण्यात येणार असून येणाऱ्याखरीप हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न कृषी विभाग करणार आहे.

नक्की वाचा:मराठवाड्यासाठी खूशखबर! मराठवाड्यात यंदा पडेल मान्सूनच्या सरासरीइतका पाऊस- ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. साबळे यांचा अंदाज

आतापर्यंत आपण विचार केला तर केवळ ऑफिसमध्ये बसून कुठल्याही हंगामाचा एक आराखडा तयार केला जात होता. परंतु नेमका यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी व उत्पादन वाढीसाठी काय प्रयत्न व्हायला हवेत? इत्यादी गोष्टींचा यामध्ये विचारच होत नव्हता. म्हणून या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या कृषी विभागाने खरिपाच्या हंगामाच्या नियोजनात प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

English Summary: now involve of farmer in planning of kahrip session this year
Published on: 18 April 2022, 01:44 IST