News

स्ट्रॉबेरी हे फळ अगदी सगळ्यांना आवडते मात्र ते केवळ थंड हवेच्या ठिकाणीच येते. अनेकांना वाटते की हे फळ आपण आपल्या शेतात लावावे, मात्र ते शक्य होत नाही. त्यासाठी योग्य हवामानाची गरज असते. ते महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी येते.

Updated on 15 January, 2022 11:51 AM IST

स्ट्रॉबेरी हे फळ अगदी सगळ्यांना आवडते मात्र ते केवळ थंड हवेच्या ठिकाणीच येते. अनेकांना वाटते की हे फळ आपण आपल्या शेतात लावावे, मात्र ते शक्य होत नाही. त्यासाठी योग्य हवामानाची गरज असते. ते महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी येते. मात्र आता मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याने याला फाटा देत आपल्या शेतात हे पीक घेतले आहे. यामुळे या शेतकऱ्याची परिसरात मोठी चर्चा सुरु आहे. मुळशी तालुक्यातील भूगाव येथे तब्बल साडेचार एकरमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे. यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही मात्र ते खरे आहे.

मुळशी येथील भूगावचे माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी मधुकर गावडे यांनी हा अभिनव प्रयोग केला आहे. मुळशी हा तालुका भात शेतीसाठी अधिक प्रसिद्ध आहे. तरीही अशा ठिकाणी मधुकर गावडे यांनी स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि यात ते यशस्वी देखील झाले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेला हा प्रयोग बघण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत. यासाठी त्यांनी अभ्यास आणि योग्य नियोजन करून तसेच यासाठी मोठा खर्च देखील केला आहे.

यामध्ये त्यांना त्यांचा भाऊ अमोल सणस हे देखील मदत करतात. मधुकर गावडे फक्त शेती करून थांबले नाही. तर एक शेतकरी मार्केटिंगमध्ये देखील कशा पद्धतीने करू शकतो याचा उत्तम पायंडा देखील त्यांनी घालून दिला आहे. ते स्वतः या स्ट्रॉबेरीची मार्केटिंग व्यवस्थित उत्तमरीत्या करतात आणि त्यांना यात लाखोचा फायदा होतो. यामुळे ते एक आदर्श शेतकरी तर ठरतातच मात्र त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी शेती परवडत नाही असे सांगणाऱ्याला याबाबत एक नवी दिशा दिली आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक शेतकरी असा वेगळा प्रयोग नक्कीच करतील.

त्यांच्या या शेतीला पर्यटक देखील भेटी देत आहेत. यामुळे कृषी पर्यटनाला देखील यामुळे चालना मिळणार आहे. अलीकडच्या काळात कृषी पर्यटन देखील मोठ्या प्रमाणावर उदयास आले आहे. तसेच मुळशी तालुका हा पर्यटनासाठी देखील ओळखला जातो. यामुळे आता कृषी पर्यटन देखील पुढे येऊ लागले आहे. यासाठी अनेक शेतकरी प्रयत्नशील आहेत. यामुळे आता महाबळेश्ववरची स्ट्रॉबेरी न म्हणता कोणी पुण्याची स्ट्रॉबेरी म्हटले तर काही वावगे वाटायला नको. या शेतकऱ्याची यामुळे परिसरात मोठी चर्चा आहे.

English Summary: Now in the strawberry market of Pune, the innovative experiment of the native farmer is being discussed everywhere.
Published on: 13 January 2022, 11:41 IST