शेतमजुरां अभावी शेती ही कल्पनाच आपण करू शकत. अल्पभूधारक शेतकरी असतील तर ठीक आहे परंतु दोन ते तीन एकर पेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांना शेतमजुरां शिवाय पर्याय नाही. अशा या शेतीच्या अविभाज्य अंग असलेल्या शेतमजुरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
यासाठी केंद्र सरकारने आता इ श्रम योजना सुरु केली आहे. नेमकी ही योजना काय आहे याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
नेमकी काय आहे ई श्रम योजना?
केंद्र सरकारने आता शेतमजुरांना ही अपघात विमा चे कवच् मिळावे याकरिता ईश्रम योजना सुरु केली आहे. देशातील असंघटित कामगार व मजुरांना ईश्रम पत्र मिळवून देणारी योजना सुरू केले आहे. योजना शेती मध्ये कुठल्याही प्रकारचे मजुरीचे काम करणाऱ्या मजुरांना देखील लागू आहे. त्यामुळे नोंदणीकृत शेतमजुरांना दोन लाखांपर्यंत अपघात विम्याचे कवच मिळू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली.
संपूर्ण देशात असलेल्या असंघटित कामगार व मजूर यांची एकत्रित माहिती संकलित करण्यासाठी केंद्र सरकारनेईश्रम नावाचे एक संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर मोफत नोंदणी करता येते. आतापर्यंत या संकेतस्थळावर आठ कोटीहून अधिक असंघटित कामगार व मजुरांनी नोंदणी केली आहे.
या योजनेमध्ये शेती व शेतीशी संलग्न क्षेत्रातील मजूर तसेच रोजगार हमी योजनेतील मजूर, फलाटावर काम करणारे मजूर तसेच फेरीवाले,घरकाम करणारे इत्यादी क्षेत्रातील मजुरांना सहभागी होता येणार आहे.या योजनेसाठी नोंदणी साठी गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रावर जाऊन आमदारांनी नोंदणी करून घ्यावी.
नोंदणी करायला जाताना आधार क्रमांक, आधार लिंक तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या बँक खात्याचा तपशील सोबत ठेवावा. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय हे 16 ते 59 वर्षे या दरम्यान असावे. या योजनेअंतर्गत नोंदणी केल्यावर डिजिटल ई श्रम कार्ड उपलब्ध होते. या कार्डवर एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिलेला असतो तो पूर्ण देशात कुठेही विविध कामं करता वापरला जाणार आहे.
Published on: 26 November 2021, 07:28 IST