सध्या कोळसा टंचाई तसेच विजेचे अनेक समस्यांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर येत आहे
ती म्हणजे सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व आजूबाजूच्या परिसराची केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक तीन दिवसापासून पाहणी करत असून या भागातील रेल्वे तसेच रस्ते मार्गाने होणारी कोळसा वाहतूक ही फायद्याची होणार असल्याने एनटीपीसी च्या पथकाने या प्रकल्पाबाबत अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प लवकर वीजनिर्मिती करू शकेल अशा आशयाचे चिन्हे दिसत आहेत. यासंदर्भात मागील काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनांमध्ये ऊर्जामंत्री व संबंधित विभागाच्या सचिव व इंडियाबुल्सच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची दोनदा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार माणिकराव कोकाटे यांनी 1350 मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू झाला तर या विभागामध्ये रोजगाराच्या संधी वाढतील आणि विस्की मी परिघातील शेतकर्यांना 24 तास वीजपुरवठा होऊ शकेल अशी माहिती देत हा वीज प्रकल्प सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती.
त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाजनकोच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यात यावी अशा सूचना केल्यात तर महाजनको व महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाने याकडे लक्ष घालण्याची मागणी केली होती. याचाच परिणाम म्हणून केंद्र सरकारच्या एनटीपीसीचे पथक गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व आजूबाजूच्या परिसराची पाहणी करत आहेत. या प्रकल्पाबाबत केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी अनुकूलता दर्शवली असून प्रत्येकी 270 मेगावॅटचा एक, 540 मेगावॅट चे दोन मिनिट सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.
रतन इंडिया प्रोजेक्टच्या मालकांची विसी द्वारे हजेरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीसाठी या प्रकल्पाचे मालक राजीव रतन व्हीसी प्रणालीद्वारे हजर होते. यामध्ये त्यांनी मुद्दा मांडला होता की हा प्रकल्प चालवण्याची क्षमता कंपनीची राहिली नसल्याने माणिकराव कोकाटे यांनी सुचवल्याप्रमाणे सरकारी भागीदारीत हा प्रकल्प सुरू करण्याची विनंती अजित पवार यांच्याकडे त्यांनी केली होती.
शिवाय रतना इंडियाचे अधिकारी राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोकाटे यांना या प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यामागे कोणत्या अडचणी आहेत याची नेमकी कल्पना देऊन कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याची माहिती दिली होती. शेवटी या सर्व गोष्टींची आणि परिश्रमाची फलनिष्पत्ती झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:एक पाऊल टाका पुढे! ज्वारी पिकवा आणि करा ज्वारीवर प्रक्रिया, कमवा चांगला नफा
नक्की वाचा:कौतुकास्पद पार्श्वभूमी! राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार नव्हे शेतकरी राजाचा आत्म सन्मान होय
Published on: 06 May 2022, 10:59 IST