भारतात केळीची शेती ही मोठ्या प्रमाणात होते, महाराष्ट्रात याची लागवड लक्षणीय आहे. खांदेश मध्ये राज्यातील सर्वात जास्त केळी लागवड बघायला मिळते. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची बातमी खास आहे. भारतातील एक प्रमुख सहकारी खत निर्माती कंपनी इफको ने केळ्यापासून अनेक उत्पादने बनवण्यास सुरवात केली आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार असे सांगितले जात आहे.
यासंबंधित अशी बातमी समोर येत आहे की, इफको ने केळीच्या देठापासून चॉकलेट, कागद, कापडं, खत इत्यादी प्रॉडक्ट्स बनवायला सुरवात केली जात आहे. इफकोच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फायदा नजीकच्या काळात होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, इफको (इंडियन फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) चे अध्यक्ष दिलीप संघानी यांनी सांगितले की, हा उपक्रम सर्वप्रथम गुजरात राज्यात बघायला मिळाला होता, गुजरातचे कृषी मंत्री यांनी हा प्रयोग गुजरातमध्ये सुरू केला होता. येथे केळीच्या देठाच्या पहिल्या थरापासून कापडं, दुसऱ्या थरातून कागद आणि तिसरा थर जो अतिशय मऊ लगदा होता, यापासून चॉकलेट बनविण्याचे काम सुरू होते. तसेच यापासून खत निर्मिती देखील केली जात होती. मात्र आता इफकोतर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे आणि प्रशिक्षण देऊन हे काम पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, उत्तर प्रदेश राज्यात हा प्रयोग सुरु करण्यात येणार आहे, इफको उत्तर प्रदेश राज्यातील बाराबंकी जिल्ह्यातील पद्मश्री ने सन्मानित शेतकरी राम सरण यांच्या सहयोगाने परिसरातील शेतकऱ्यांना याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. रामसरण यांच्याजवळ जवळपास 300 एकर शेती आहे व त्यांनी यावर केळीची लागवड केली आहे. इफकोच्या या प्रयोगामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे तसेच अनेक लोकांना यामुळे रोजगार देखील मिळणार आहे
Published on: 19 December 2021, 04:32 IST