News

नाशिक: बर्याचदा जास्त पाऊस पडल्यामुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होते किंवा शेती पिकांचे देखील अतोनात नुकसान होते. एवढेच नाही तर इतर देखील भरपूर नुकसान होते. नंतर या नुकसानीचे पंचनामे केले जातात व नुकसान भरपाई विषयी निर्णय घेतला जातो.

Updated on 09 July, 2022 9:28 AM IST

नाशिक: बर्‍याचदा जास्त पाऊस पडल्यामुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होते किंवा शेती पिकांचे देखील अतोनात नुकसान होते. एवढेच नाही तर इतर देखील भरपूर नुकसान होते. नंतर या नुकसानीचे पंचनामे केले जातात व नुकसान भरपाई विषयी निर्णय घेतला जातो.

परंतु आता पावसामुळे जर शेती पिकांचे किंवा घरांची किंवा इतर नुकसान झाले तर संबंधित नुकसान भरपाई चे पंचनामे करताना महावेध या हवामान खात्याच्या अधिकृत वेबसाईटचा अर्थात संकेतस्थळावरील आकडे अंतिम समजले जाणार आहेत.

म्हणजे या वर्षापासून झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे महावेधच्या आकड्यांनुसार केले जाणार आहेत. जर आपण आतापर्यंतच्या पद्धतीचा विचार केला तर जर मुसळधार पावसात पुढे गावामध्ये नुकसान झाले तर महसूल विभाग आणि कृषी विभाग

यांच्याकडून संयुक्तरित्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. हे पंचनामे करताना पावसाचे अट आणि शेत पिकांचे 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान असेल तरच पंचनामे करून शासनाकडून मदत दिली जाते.

नक्की वाचा:Rain Update: पुढील चार दिवस धोक्याचे; 'या' भागात रेड अलर्ट

यामुळे बऱ्याचदा नुकसान जास्त होऊन देखील अटी पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागते.

यामध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहू नयेत यासाठी महावेध या संकेतस्थळावर उपलब्ध होणाऱ्या आकडे यांनाच ग्राह्य धरावे आणि त्यानुसारच पंचनामे करतांना संदर्भ देखील घ्यावा असे स्पष्ट आदेश शुक्रवारी महसूल विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षणात देण्यात आले.

नैसर्गिक आपत्तीमुळे करण्यात येणारे पंचनामे आणि नुकसान झालेल्यांना वितरित करावयाच्या मदती संदर्भात विशेष ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये विभागीय आयुक्तांनी अचूक  पंचनामे अन योग्य लाभार्थ्यांना मदत देणे हे  आद्य कर्तव्य समजून काम करायचं सूचना दिल्या.

नक्की वाचा:Punjabrao Dakh: पंजाबराव यांचा 17 जुलैपर्यंतचा मान्सूनचा अंदाज, वाचा सविस्तर

 'या' गोष्टींची खातरजमा केली जाईल

 या बैठकीत सटाण्याचे प्रांताधिकारी बबन काकडे आम्ही सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना योग्यरीत्या पंचनामे कसे करायचे याबाबत प्रशिक्षण दिले.

यामध्ये त्यांनी पंचनामा केल्यानंतर ते क्षेत्र संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर आहे का? सातबारा कोणाच्या नावाचा आहे किंवा नुकसान झालेली पिक पाहणीत नोंदवले आहे का याची खातरजमा करावी.

तसेच मदत देण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल त्यामध्ये एकाच खातेदाराला अधिक वेळा मदत तर जात नाही ना, देखील तपासून घ्यावे अशा देखील सूचना दिल्या गेले आहेत.

नक्की वाचा:Rain Update: मुंबई पुन्हा तुंबली…! राजधानीत पावसाचं तांडव, मुंबईसमवेतचं 'या' ठिकाणी उद्या पण मुसळधारा; IMDचा अंदाज

English Summary: now for get compansation package valid on digit of mahavedh website
Published on: 09 July 2022, 09:28 IST