News

शेतकऱ्यांना एकरी मशागतीसाठी २०० रुपयांची वाढ झाली आहे. असे असताना अनेक ठिकाणी मात्र डिझेलची दरवाढ झाल्याचे सांगून मोठ्या प्रमाणावर पैसे काढले जातात. यामुळे सध्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात डिझेल पुरविण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.

Updated on 03 April, 2022 3:09 PM IST

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर डिझेल आणि पेट्रोलची दर वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. असे असताना आता याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. या हंगामात डिझेल दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या (Tracter) साह्याने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मशागतीच्या दरात ट्रॅक्टरमालकांनी वाढ केली आहे.

आता शेतकऱ्यांना एकरी मशागतीसाठी २०० रुपयांची वाढ झाली आहे. असे असताना अनेक ठिकाणी मात्र डिझेलची दरवाढ झाल्याचे सांगून मोठ्या प्रमाणावर पैसे काढले जातात. यामुळे आता याची मोठी झळ बसू लागली आहे. यामुळे शेतीचा उत्पादन खर्चही आणखी वाढणार आहे. यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न पडला आहे. शेतकरी देखील सध्या अनेक संकटाचा सामना करत आहे. तसेच त्याच्या मालाला बाजारभाव देखील नाही.

सध्या शेतीतील मशागतीची संपूर्ण कामे ट्रॅक्टरने केली जातात. रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, पंजी, अशा वेगवेगळ्या मशागती केल्या जातात. सध्या थ्रेशरच्या साह्याने हरभरा मळणीचे कामही होत आहे. या सर्वच कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर होतो. तसेच ऊस वाहतुकीसाठी अनेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे. यामुळे अनेकांनी आपले दर वाढवले आहेत.

यामुळे सध्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात डिझेल पुरविण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. वाशीम जिल्ह्यात गहू काढणीचा दर हार्वेस्टरने एकरी बाराशे रुपये होता. तो दर यंदा पंधराशे रुपये असा घेतला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी गहू (Wheat) काढणीचा दर १,५०० रुपये प्रति एकर होता तो या वर्षी २,००० रुपयांपर्यंत वाढला आहे. अशीच परिस्थिती सर्व राज्यात आहे.

महत्वाच्या बातम्या;
तब्बल ४००० कोटींची गुंतवणूक, शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा...
फिर हेरा फेरी नाही, ही तर आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, पैसे होत आहेत दुप्पट
मोदींचे 'हे' कार्ड शेतकऱ्यांसाठी ठरतय वरदान, शेतकऱ्यांना लाखांमध्ये मिळतंय कर्ज..

English Summary: Now farmers will get diesel in the form of subsidy? Discussion started due to high cost of cultivation ..
Published on: 03 April 2022, 03:07 IST