ऊस पिकाच्या नोंदीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून तो म्हणजे राज्यातील साखर कारखान्यांच्या शेती विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप कसे वापरावे यासंबंधीची माहिती व प्रशिक्षणाची कार्यवाही करावी
व शेतकऱ्यांनी स्वतः सातबारा मध्ये लागवड झालेल्या ऊस पिकाच्या नोंदी ई पीक पाहणी अँपद्वारे कराव्यात, अशा आशयाच्या सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांना दिले आहेत.
याबाबतीत साखर आयुक्तालयाने एक परिपत्रक काढले असून त्यामध्ये म्हटले आहे की, महसूल व वन विभागाच्या पीक पाहणी प्रकल्पाची सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने 30 जुलै 2021 च्या शासन निर्णयान्वये ई पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा:महापालिकेचे दुर्लक्ष; आमदाराने थेट गटारात उतरून केले आंदोलन
या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सनियंत्रण समितीच्या 20 ऑगस्ट 2021 रोजी च्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार साखर कारखान्याच्या शेती विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी अँप वापरकर्ता माहिती व प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावयाचे आहे.
शेतकऱ्यांनी स्वतः गाव नमुना नंबर 12 अर्थात सातबारा मध्ये पेरणी - लागवड झालेल्या पिकांच्या नोंदी मोबाईलवरील इ पीक पाहणी ॲप द्वारे करावयाच्या आहेत.
सर्व साखर कारखान्यांनी मोहीम स्वरुपात आपल्या कारखान्याकडे नोंद झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून सातबारामध्ये उसाच्या नोंदी करून घ्याव्यात.
नक्की वाचा:शेतकरी कर्जदारांनी फिरवली पाठ; बँकेची आर्थिक परिस्थिती डबघाईस
अशा प्रकारच्या नोंदी केल्यामुळे ऊस लागवड क्षेत्रा विषयीअचूक अंदाज बांधता येईल व संबंधित साखर कारखान्यांना देखील नक्की किती ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल याची अचूक माहिती मिळेल.
या ॲपच्या माध्यमातून ऊस नोंदणीची कार्यवाही सुलभतेने होण्यास सर्व कारखान्यांना यापुढे मदत होणार आहे. यासाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक व तलाठी यांचे सहकार्य घ्यावे.
अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदाराचे संपर्क साधावा. तसेच 2022-23 च्या गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या ऊस पिकाच्या नोंदी सातबारा मध्ये घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अशा सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
नक्की वाचा:दमदार आमदार; शिंदे सरकार येताच भास्कर जाधव लागले शेती कामाला..
Published on: 07 July 2022, 09:24 IST