ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचे काम म्हणजे उसाची नोंदणी असते. यासाठी शेतकऱ्यांना अनेकदा कारखान्यावर चकरा माराव्या लागतात. आता मात्र हे काम बंद होणार आहे. आता गावशिवारात बसून ऊस नोंदविण्यासाठी शासनाने 'महाऊस नोंदणी' मोबाईल अँप चालू केले आहे.
यामुळे आता शेतकऱ्यांचा होणारा त्रास आणि वेळही वाचणार आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत साखर आयुक्तालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या अॅप्लिकेशनला सुरुवात झाली. महाऊस नोंदणी अॅप्लिकेशनमुळे राज्यातील शेतकऱ्यांना नोंदणीचे पूर्ण स्वातंत्र्य प्रथमच मिळत आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
यामध्ये ४० लाख शेतकरी या उपक्रमात आहेत. शेतकऱ्याने एकदा नोंदणी करताच त्याचा ऊस कापून नेण्याची सक्ती आम्ही करणार आहोत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस बिननोंदणीचा किंवा बिगरकापणीचा राहणार नाही, असे आयुक्त म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन मिटणार आहे.
Sugar Production; देशातील साखरेचं अतिउत्पादन ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या, साखरेचं उत्पादन कमी करा..
काही कारखाने ऊस नोंदी करीत नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो. यामुळे आम्हाला मध्यस्थी करून नोंदी करून घ्याव्या लागतात. त्यामुळे या समस्येची जाणीव मला आहे, असेही ते म्हणाले. यामुळे येणारा काळ हा शेतकऱ्यांचा असणार आहे.
यासाठी मोबाईलमध्ये गुगल प्लेस्टोअरमधून 'महाऊस नोंदणी' (Maha Us Nondani) नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे. अॅप डाऊनलोड होताच 'ऊस क्षेत्राची माहिती भरा' या ठिकाणी बटण दाबावे. त्यानंतर 'ऊस क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती' असा भाग दिसू लागेल.
कृषी अधिकारी असल्याचे सांगून खत विक्रेत्यांकडे पैशांची मागणी, अनेक तक्रारी दाखल..
आपला मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पूर्ण नाव टाकावे. त्यानंतर 'पुढे' असे बटण दाबावे. त्यानंतर लागवडीचा प्रकार, उसाची जात, लागवड तारीख नमूद करावी. ऊस क्षेत्र गुंठ्यामध्ये भरावे. त्यानंतर पुढे असे बटण दाबावे. तेथे तीन कारखान्यांची नावे येतील. त्यात किमान एक व कमाल तीन कारखान्यांची नावे टाकता येतील.
यानंतर शेतकऱ्याला धन्यवाद असा संदेश दिसू लागेल. त्यानंतर निवडलेले कारखाने शेतकऱ्याला स्वतःहून संपर्क साधतील. यामुळे हे अँप फायदेशीर आहे. शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होणार आहे. सुरुवातीला अडचणी येतील मात्र नंतर सगळं सुरळीत पार पडेल.
महत्त्वाच्या बातम्या;
'अनेकांना फक्त टेंडर काढण्यात रस असतो, कॅनॉलचे अस्थिरीकरण 15 वर्ष सत्तेत असताना का केलं नाही?'
आता शेतकऱ्यांना मिळणार शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये, जाणून घ्या..
LIC ची जबरदस्त स्कीम, 122 रुपयांची बचत करून तुम्हाला मिळणार 26 लाख, जाणून घ्या..
Published on: 31 August 2022, 10:33 IST