News

तुमच्या कारखान्यात वजन करताना काटा मारतात का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. यावर काहीजण म्हणतात आम्हा शेतकऱ्यांना तर काट्याजवळ जाऊनच देत नाहीत. तर काहीजण म्हणतात आमचा गेटकेनचा काटा वेगळा आणि सभासदांचा वेगळा आहे. यामुळे नेमका घोळ काय आहे. हे अजूनही शेतकऱ्यांना समजला नाही. असे असताना आता एक बातमी समोर आली आहे.

Updated on 05 August, 2022 5:32 PM IST

तुमच्या कारखान्यात वजन करताना काटा मारतात का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. यावर काहीजण म्हणतात आम्हा शेतकऱ्यांना तर काट्याजवळ जाऊनच देत नाहीत. तर काहीजण म्हणतात आमचा गेटकेनचा काटा वेगळा आणि सभासदांचा वेगळा आहे. यामुळे नेमका घोळ काय आहे. हे अजूनही शेतकऱ्यांना समजला नाही. असे असताना आता एक बातमी समोर आली आहे.

आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी साखर काटामारीच्या मुद्यावरुन कारखानदारावर आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उसात काटामारी करुन कारखानदारांनी 4 हजार 581 कोटी रुपयांचा दरोडा टाकला असल्याचा आरोप शेट्टींनी केला. यामुळे चर्चा सुरु झाली आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील साखर कारखाने सरासरी वजनाच्या 10 टक्के काटा मारतात. मागच्या हंगामात महाराष्ट्रात 13 कोटी 20 लाख टन उसाचे गाळप झाले. म्हणजेच काटा मारुन 1 कोटी 32 लाख टन उसाची चोरी झाली आहे. अधिकाऱ्यांकडून ओटीपी घेतल्याशिवाय तलाठ्याला सात बाऱ्यात नोंदी करता येत नाहीत. ऑईल कंपनीने परवानगी दिल्याशिवाय पेट्रोल पंपचालकाला पेर्टोरल मोडमाप करणाऱ्या यंत्राशी छेडछाड करता येत नाही.

कांदाप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा, पण..

मग साखर आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणत्याही साखर कारखान्याला वजन काट्याशी छेडछाड करता येणार नाही, असा आदेश का निघत नाही? असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जवळचा आणि महत्वाचा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्रात 13 कोटी 20 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. यामध्ये राज्याची सरासरी रिकव्हरी ही 11.20 आहे. म्हणजेच 14.78 लाख टन एवढ्या साखरेची चोरी झाल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

रोहित पवारांना मोठा धक्का! विधान परिषदेवर जाताच राम शिंदेंनी करून दाखवलं..

ही साखर किरकोळ किराणा दुकान, मिठाईवाले, शितपेय कंपन्यास विना पावतीची विक्री केली जाते. सरकारी दराप्रमाणे याची किंमत 4 हजार 581 कोटी रुपये होते. तर यामधून शासनास मिळणाऱ्या GST रुपातील कर हा 229 कोटी रुपये होतो. किरकोळ व्यापाऱ्यांवर धाडी टाकणारं GST चं खातं का गप्प आहे? दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत असेही राजू शेट्टी म्हणाले. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:
शेणापासून बनवलेल्या भारतीय राख्यांना जगभरात मागणी! अमेरिकेतूनही आली ऑर्डर..
शरद पवारांचे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्षपद गेले, आता अजित पवारांचेही मोठे पद जाणार, राष्ट्रवादीला मोठा धक्का
मँगो मॅन हाजी कलीमुल्ला यांचे सुष्मिता सेन, अमित शहा यांच्या नावावर नवीन वाणांची निर्मिती...

English Summary: Now even in sugar cane! 4581 crore scam, excitement in the state..
Published on: 05 August 2022, 05:32 IST